Hasan Mushrif Amit Shah esakal
कोल्हापूर

Hasan Mushrif : हसन मुश्रीफांनी शब्द टाकला अन् अमित शहा कोल्हापूरला येण्यास झाले तयार; काय आहे कारण?

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते लवकरच या कामाचे भूमिपूजन होणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातील अत्यावश्यक सोयी -सुविधा, अंतर्गत रस्ते आणि सांडपाणी व्यवस्थेसाठी ४४ कोटींचा निधी मंजूर झाल्याची माहिती मुश्रीफ यांनी दिली.

कोल्हापूर : शेंडा पार्कातील (Shenda Park Kolhapur) ३० एकरांत एक हजार कोटी खर्चाच्या ११०० खाटांच्या सर्व सोयी आणि सेवा-सुविधायुक्त अद्ययावत रुग्णालय होत आहे. या रुग्णालयाच्या कामाला स्वतंत्र प्रशासकीय मान्यता मिळाल्याची माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी येथे दिली.

रुग्णसेवा माझा जिव्हाळ्याचा विषय आहे. जिल्ह्यातील अत्याधुनिक आरोग्यसंकुल ही माझ्या आयुष्यातील सर्वोच्च समाधानाची बाब असल्याचेही ते म्हणाले. या अद्ययावत संकुलामध्ये ६०० खाटांचे सामान्य रुग्णालय व बाह्य रुग्ण विभाग, २५० खाटांचे कर्करोग रुग्णालय आणि २५० खाटांचे सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल होणार आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्या हस्ते लवकरच या कामाचे भूमिपूजन होणार आहे. दरम्यान; छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातील अत्यावश्यक सोयी -सुविधा, अंतर्गत रस्ते आणि सांडपाणी व्यवस्थेसाठी ४४ कोटींचा निधी मंजूर झाल्याची माहिती मुश्रीफ यांनी दिली.

ते म्हणाले, ‘शेंडा पार्क येथे होत असलेल्या राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी जागा आणि संपूर्ण परिसर विकसित करण्याचे काम वैद्यकीय शिक्षण विभागाने युद्धपातळीवर हाती घेतलेले आहे. शासन स्तरावरील ४५१ कोटींच्या तिन्ही स्वतंत्र प्रशासकीय मान्यता नुकत्याच मिळाल्या आहेत. सात मोड्युलर ऑपरेशन थिएटर, सीएसएसडी, इमारतींची आणि अंतर्गत रस्त्यांची देखभाल-दुरुस्ती यांच्यासाठीही ७३ कोटींची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.’

या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आवारातील ऑडिटोरियम हॉल, नवीन परीक्षा भवन, मध्यवर्ती ग्रंथालय इमारत, शवविच्छेदन गृह, मुलींचे वसतिगृह अशा पाच इमारती ५८ कोटी निधीतून पूर्णत्वाला आलेल्या आहेत. या कामांचा लोकार्पण सोहळाही होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दृष्टिक्षेपात नवे रुग्णालय

  • - एकूण ३० एकरांत ११०० खाटांचे रुग्णालय

  • - न्यायवैद्यक शास्त्राची स्वतंत्र इमारत

  • - २५० क्षमतेचे निवासी डॉक्टर व आंतरवासितांसाठी वसतिगृह

  • - २५० क्षमतेचे महिला वसतिगृह

  • - १५० क्षमतेचे मुलींचे वसतिगृह

  • - १५० क्षमतेचे मुलांचे वसतिगृह

  • - परिचारिका प्रशिक्षण केंद्र इमारत

  • - सेंट्रल लायब्ररी

  • - ४०० क्षमतेचे परीक्षा भवन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT