कोल्हापूर

भरतीसाठी उंचीची युक्ती आली अंगलट ; दोन तरूणांचे पितळ उघड

एकाच दिवशी दोन घटना ; परीक्षार्थीमध्ये खळबळ

अमृत वेताळ

बेळगाव : उंची कमी असून देखील पोलीस उपनिरीक्षक म्हणून पोलीस खात्यात भरती होण्याची इच्छा असलेल्या दोघा तरुणांना त्यांची आगळीक चांगलीच अंगलट आली आहे. डोक्यावर थर्माकाॅल आणि त्यावर विग घालून शारीरिक परीक्षेसाठी हजर झालेल्या दोघा परीक्षार्थींना बेळगाव ग्रामीण आणि मार्केट पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाळप्पा सनाप्पा दूरदुंडी (रा. जागनूर ता. चिकोडी) आणि उमेश एन. वाय. (वय २८, रा. कुलगोड ता. मुडलगी) अशी अटक करण्यात आलेल्या दोघा परीक्षार्थींची नावे आहेत.

उंची कमी असून देखील पोलीस उपनिरीक्षक म्हणून पोलीस खात्यात भरती होण्याची इच्छा आली तरूणांच्या अंगलट

याबाबत पोलिसांतून समजलेली अधिक माहिती अशी,

गुरुवार (ता.१२) नागरी पोलीस उपनिरीक्षक पदासाठी शारीरिक चाचणी परीक्षेचे ठीकठिकाणी आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे आज सकाळी आठच्या सुमारास मच्छे येथील केसआरपी दुसऱ्या बटालियनच्या मैदानावर शारीरिक परीक्षेसाठी बाळप्पा हजर झाला होता. त्याची उंची १६५ सेंटिमीटर होती. उंची कमी असताना देखील त्याने शारीरिक परीक्षा देण्याचे धाडस केले होते. सदर परीक्षेसाठी किमान १६८ सेंटीमीटर उंची असणे जरुरीचे होते. त्यामुळे त्याने आपल्या डोक्यावर तीन थर्माकोल , त्यावर विग घातले.

उंची तपासण्यापूर्वी धावण्याची परीक्षा घेत असताना त्याच्या डोक्यावरील केसाबद्दल केसारपी कमांडोंना संशय आला. त्यामुळे त्याला बाजूला बोलावून तपासणी केली असता त्याने डोक्यावर बनावट विग वापरले असल्याचे दिसून आले. त्यांनी ही माहिती बेळगाव ग्रामीण पोलिसांना दिली.

पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन फसवणुकीचा गुन्हा दाखल करून अटकेची कारवाई केली. त्याचबरोबर मार्केट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डीएआर मैदानात देखील उंची कमी असताना शारीरिक चाचणीसाठी डोक्यावर बनावट विग घालून हजर झालेल्या उमेश या तरुणाला अटक करण्यात आली. त्याने फेविकॉल लावून विग घातले होते. त्याच्यावर देखील फसवणुकीचा गुन्हा दाखल करून घेण्यात आला आहे. एकाच दिवशी घडलेल्या या दोन घटनांमुळे पोलीस उपनिरीक्षक पदाची शारीरिक चाचणी देण्यासाठी उपस्थित असलेल्या परीक्षार्थीमध्ये खळबळ उडाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राज्य सरकारने नवीन ऑटो रिक्षा परवान्यांना का दिली स्थगिती? परिवहनमंत्र्यांनी सांगितलं नेमकं कारण...

Lemon Price Hike: उन्हाच्या वाढत्या पाऱ्यामुळे लिंबू महाग, एका लिंबाची 'इतकी' किंमत

Latest Marathi News Live Update: कोल्हापूरमध्ये कोर्टातच वकिलाला मारहाण

Pune News : ‘एचपीव्‍ही’लसीकरणास महापालिकेच्‍या दवाखान्‍यांत सुरवात; महापालिकेला मिळाले १९ हजार लसीचे डोस

स्वयंपाकघरात उतरल्या 'तिघी'; ‘तिखट मीठ फूड्स’ क्लाऊड किचनसोबत अनोखा उपक्रम

SCROLL FOR NEXT