कोल्हापूरचे नाव 'कलापूर' करा ; सचिन पिळगावकरांची आग्रही मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोल्हापूरचे नाव 'कलापूर' करा ; सचिन पिळगावकरांची आग्रही मागणी

जसे मुंबईला एवढ चांगल नाव असताना बॉम्बे केलं. तसेच कोल्हापूरचे नाव कलापूर कराव; पिळगावकरांची मागणी.

कोल्हापूरचे नाव 'कलापूर' करा ; सचिन पिळगावकरांची आग्रही मागणी

कोल्हापूर : कोल्हापुर ( Kolhapur) कलेचे माहेरघर आहे. तिथे चित्रपट सृष्टी आहे, कलावंत आहेत. इंग्रजांनी वेगळ्या पद्धतीने उच्चारच कलापूरचं कोल्हापूर केलं. जसे मुंबईला (Mumbai) एवढ चांगल नाव असताना बॉम्बे केलं. तसेच कोल्हापूरचे नाव कलापूर कराव. अशी मागणी चित्रपट दिग्दर्शक, अभिनेते सचिन पिळगावकर यांनी केली आहे. एबीपी माझा आयोजित माझा महाराष्ट्र माझं व्हिजन या कार्यक्रमात ते बोलत होते.

ते म्हणाले, सिनेमा क्षेत्रात आज अनेक बदल झालेले आहेत. आज सगळीकडे डिजिटलायझेशन झालेले आहे .पण आधी सारखी मजा नाही. याचा अर्थ असा नाही की मी नवीन गोष्टी मानत नाही. गेली 58 वर्षे या क्षेत्रात काम करत आहे. या काळात मी नवीन प्रयोग करत आलो आहे, आणि अजूनही शिकत आहे.

हेही वाचा: कर्नाटकात येण्यास कोरोना चाचणी आवश्यक; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको

कोणतीही कला सादर करत असताना प्रेक्षकांचा विचार आधी केला जातो. आज प्रेक्षक खुप दक्ष झाले आहेत. प्रेक्षकांनी आम्हाला बदलवलं तरीही चुका घडत आहेतच. प्रेक्षक जेवढे दक्ष होतील तेवढी कलाकृती बनवणारी माणसं आपले टूल्स बदलतील. आता काही करून उपयोगाचे नाही कारण प्रेक्षक लगेच पकडतात . असे सचिन पिळगावकर म्हणाले.

loading image
go to top