biting two home kolhapur 
कोल्हापूर

कोल्हापूच्या म्हारूळ येथे दोन कुटुंबात हाणामारी ; तलवार, चाकू काठीचा वापर

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर -  म्हारूळ (ता. करवीर) येथे दागिन्याच्या कारणावरून दोन कुटुंबात जोरदार हाणामारी झाली. यात तलवार, चाकू व काठ्याचा वापर करण्यात आला. मारहाणीत सात जण गंभीर जखमी झाले. याप्रकरणी करवीर पोलिस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले. 

मारामारीतील दोन्ही कुटुंबातील जखमींची नावे ः युवराज पाटील, भगवान कवडीक, सारिका कवडीक, रघुनाथ कवडीक, जोतीराम खाडे, राधिका कवडीक, विशाल खाडे अशी आहेत. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती, म्हारूळ (ता. करवीर) येथे गुरुवारी सायंकाळी दोन कुटुंबे एकमेकांस भिडले. त्यात जखमी झालेल्या सात जणांना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले. दरम्यान याबाबत करवीर पोलिस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले. सारिका भगवान कवडीक यांनी दिलेल्या फिर्यादेनुसार संशयित रघुनाथ पांडुरंग कवडीक, राधिका रघुनाथ कवडीक (दोघे रा. म्हारूळ), विशाल जोतीराम खाडे व जोतीराम गणपती खाडे (दोघे रा. सांगरूळ, ता. करवीर) या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच रघुनाथ पांडुरंग कवडीक यांनी दिलेल्या फिर्यादेनुसार संशयित भगवान पांडुरंग कवडीक, सारिका भगवान कवडीक (दोघे रा. म्हारूळ), युवराज सर्जेराव पाटील, विकास लक्ष्मण सावंत (दोघे रा. आमशी, करवीर) आणि सुहास सर्जेराव पाटील (रा. कसबा बावडा) या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. 


संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav DJ Ban : पुण्यात डीजेवर बंदी येणार? गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाद आणखी चिघळला; पोलिस उपायुक्तांनी केला खुलासा

TVKच्या नेत्याला पाठलाग करत क्रूरपणे संपवलं, कोयत्याने सपासप वार; मृत्यूनंतरही वार करतच राहिले, घटना CCTVत कैद

महात्मा गांधींच्या भूमिकेत दिसणार मनोज बाजपेयी; १० किलो वजन घटवलं, नवा लूक पाहून चाहते शॉक

Marathi News Live Updates : माजलगावच्या कॅनॉलमध्ये अज्ञात मृतदेह पाईपलाइनला अडकला

Chinchwad Electricity ट्रान्सफर्मरला आग, चिंचवड, वाल्हेकरवाडीसह रावेत परिसरात वीजपुरवठा खंडित; आगीचा VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT