'धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा' 

धनाजी सुर्वे 
Wednesday, 13 January 2021

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही या प्रकरणावर आपली भूमिका मांडली. आहे

कोल्हापूर - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने केलेल्या बलात्काराच्या आरोपांनतर राजकीय वर्तुळात मोठा गदारोळ माजला आहे. मुंडे यांच्यावर केलेल्या आरोपानंतर भाजपने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ट्विट करत मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे. 

हिंदू धर्मात दोन पत्नी चालत नाहीत आणि त्याला न्यायही नाही. धनंजय मुंडे यांनी राजीनामा न दिल्यास रस्त्यावर उतरु, असा इशारा भाजपच्या महिला मोर्चाच्या अध्यक्ष उमा खापरे यांनी दिला होता. त्यानंतर आता पदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही भाजपच्या महिला मोर्चाच्या मागणीचा दाखला देत मुंडे यांनी राजीनामा द्यावा असे म्हटले आहे.   

''सामाजिक न्याय मंत्री असलेल्या धनंजय मुंडे यांनी आपल्या चुकीच्या कृत्यांबद्दल तात्काळ राजीनामा द्यायला हवा. मुंडे यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप पाहता त्यांना मंत्री पदावर राहण्याचा कोणताही हक्क नाही. भारतीय जनता पार्टीच्या महिला शाखेच्या वतीने एक पत्रक प्रसिद्ध करण्यात आले असून त्यामध्ये मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे आणि आम्हीही आता याविषयी आणखी जोरदार मागणी करणार आहोत. ज्या व्यक्तीवर अशा प्रकारचे आरोप होतात त्याला या पदावर राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नसतो. मात्र गेंड्याच्या कातडीचे हे मंत्री आणि महाविकास आघाडीचे सरकार याबाबत आत्मपरीक्षण करून मुंडेंचा राजीनामा घेतील असे वाटत नाही. तरीही मुंडे यांनी या पदाचा राजीनामा द्यावा अशी आमची मागणी आहे.'' असे ट्विट चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. 

हे पण वाचा - धक्कादायक : गुंगीचे औषध देऊन डांबले अन् मुलीला ठार करण्याची धमकी देऊन गर्भवतीवर केले आत्याचार

 

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भूमिका 
  राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही या प्रकरणावर आपली भूमिका मांडली. आहे. “राजकारणात आयुष्य उभं करायला, राजकीय स्तरावर यायला प्रचंड कष्ट घ्यावे लागतात. कोणी आरोप केल्यानंतर त्याची सत्यता न पडताळता लगेच निष्कर्षावर येणे योग्य नाही. धनंजय मुंडेंनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. उच्च न्यायालयात देखील यापूर्वीच अर्ज दाखल केलेला आहे. ही न्यायालयीन बाब आहे. कुटुंबातील अंतर्गत बाब आहे. धनंजय मुंडेंनी याबाबत स्पष्ट मत व्यक्त केलं आहे,” असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले आहे. 

हे पण वाचाभेट इंदिरा गांधींची; कोल्हापूरच्या नेत्यांच्या हिंदीनं सुटला धरणाचा प्रश्न

>

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bjp leader chandrakant patil demands dhananjay munde rejection