कोल्हापूर

कोल्हापूर - वारणा कापशीमधून बालकाचे अपहरण

सकाळ वृत्तसेवा

कुटुंबीयांनी त्याची प्रथम चौकशी आणि मग शोधाशोध सुरू केली; पण तो कोठेच आढळला नाही.

शाहूवाडी : वारणा कापशी (ता. शाहूवाडी) येथील बालक अरव राकेश केसरे (वय ५ वर्षे ७ महिने) याचे अज्ञातांनी रविवारी अपहरण केल्याची तक्रार वडील राकेश केसरे यांनी येथील पोलिस ठाण्यात दिली. अपर पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे व शाहूवाडी विभागीय पोलिस अधिकारी रवींद्र साळुंके, पोलिस निरीक्षक विजय पाटील यांच्या नेतृत्वाखालील सहा पथके बालकाचा शोध घेत आहेत, मात्र पोलिसांच्या हाती अद्याप कोणतेही धागेदोरे मिळालेले नाहीत.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, अरव काल सायंकाळी पाचच्या सुमारास गल्लीतीलच लक्ष्मण कदम यांच्या घरासमोर खेळत होता. तो उशिरापर्यंत घरी आला नाही. त्यानंतर कुटुंबीयांनी त्याची प्रथम चौकशी आणि मग शोधाशोध सुरू केली; पण तो कोठेच आढळला नाही. त्यामुळे अज्ञातांनी त्याला पळवून नेल्याची तक्रार वडील राकेश कदम यांनी रात्री उशिरा पोलिस ठाण्यात दिली. त्यानुसार शाहूवाडी पोलिसांनी विविध ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेजची माहिती घेणे, आसपासच्या विहिरी आणि परिसरात शोधमोहीम राबविणे सुरू केले आहे.

पोलिसांनी आज कसून तपास मोहीम राबवली. वारणा कापशी येथील नाले, विहिरी, कालव्यांमध्ये यांची गळ टाकून तपासणी केली. मलकापूर एसटी आगार, बांबवडे, कापशी, भेडसगाव, कोकरूड येथील विविध ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात आली; मात्र संशयित असे अद्याप काही तपास यंत्रणेच्या हाती लागलेले नाहीत. तपास यंत्रणेसाठी सुमारे ३५ पोलिसांची सहा पथके तयार केली आहेत. अपर पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे, शाहूवाडी विभागाचे पोलिस अधिकारी रवींद्र साळुंखे, एलसीबीचे प्रमोद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथके कार्यरत आहेत.

"आम्ही अरवचा सर्व त्या पातळीवर शोध घेत आहोत. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे पस्तीस पोलिसांची सहा पथके शोधमोहिमेत कार्यरत आहेत. अल्पावधीतच सत्य बाहेर काढू."

- विजय पाटील, पोलिस निरीक्षक, शाहूवाडी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray Video: अंगाला भस्म अन् कुरळ्या केसांचा बाबा... ; राज ठाकरेंचे हावभाव चर्चेत, नाव न घेता कुणाला टोला?

लग्नसोहळा सुरू असतानाच अग्नितांडव, २२ जणांचा मृत्यू; इमारत जळून खाक, रस्त्याच्या एका बाजूला मृतदेह, दुसरीकडे जखमी लोक

५५ वर ALL OUT; तरीही हा 'शहाणा' म्हणतो, पाकिस्तान बेस्ट टीम अन् आशिया चषक जिंकणार! नेटकऱ्यांनी घेतलं फैलावर Video

Marathi News Live Updates : लाखोंच्या अनुदानात अपहार, महिला तलाठ्याला अटक

Teacher Award 2026: शाळेची पटसंख्या वाढवली, विद्यार्थ्यांना घडविले; संदीप शिंदेंचा जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरव, शाळेचा केला कायापालट

SCROLL FOR NEXT