Bhogavati Sugar Factory Congress leader Shivajirao Patil esakal
कोल्हापूर

'भोगावती'च्या अध्यक्षपदी काँग्रेसचे शिवाजीराव पाटील, तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या कवडेंची बिनविरोध निवड

निवडणुकीमध्ये आमदार पी. एन. पाटील यांच्या नेतृत्वाखालील आघाडीने २५ पैकी २४ जागा मोठ्या फरकाने जिंकल्या.

सकाळ डिजिटल टीम

आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून भोगावती कारखान्याचे अध्यक्षपद ‘करवीर’ मध्येच ठेवले आहे.

राशिवडे बुद्रुक : भोगावती साखर कारखान्याच्या (Bhogavati Sugar Factory) अध्यक्षपदी काँग्रेसचे प्रा. शिवाजीराव आनंदराव पाटील (देवाळे) व उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे राजाराम शंकर कवडे (आवळी बुद्रुक) यांची बिनविरोध निवड झाली. काल (शुक्रवार) दुपारी एक वाजता झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत निवडणूक निर्णय अधिकारी नीलकंठ करे याच्या अध्यक्षतेखाली ही निवड प्रक्रिया पार पडली.

नुकत्याच झालेल्या भोगावती कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये आमदार पी. एन. पाटील यांच्या नेतृत्वाखालील आघाडीने २५ पैकी २४ जागा मोठ्या फरकाने जिंकल्या. शुक्रवारी अध्यक्ष -उपाध्यक्ष निवडीबाबत संचालक मंडळाची बैठक झाली. तत्पूर्वी काल रात्री सर्व संचालकांना एकत्रित बोलवून आमदार पी. एन. पाटील, शेकापचे क्रांतिसिंह पाटील व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी निवडीबाबत चर्चा केली.

यामध्ये भीमराव अमृता पाटील, शिवाजीराव पाटील व सुनील खराडे यांच्या नावाची चर्चा झाल्यानंतर एक नाव आमदार पाटील यांनी आज सकाळी लखोट्यातून संचालक मंडळाला दिले. प्रारंभी भीमराव पाटील यांची नियुक्ती होईल, असे वाटत असतानाच आलेल्या लखोट्यामधून शिवाजीराव पाटील यांची अध्यक्षपदी वर्णी लागल्याचे स्पष्ट झाले. तर उपाध्यक्षपद राधानगरी तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसला देत असतानाच या पक्षाचे ज्येष्ठ संचालक अविनाश पाटील यांना संधी मिळेल, अशी अपेक्षा होती.

मात्र, राजाराम कवडे यांचे नाव ए. वाय. पाटील यांच्याकडून पुढे आले. आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून भोगावती कारखान्याचे अध्यक्षपद ‘करवीर’ मध्येच ठेवले आहे. यानुसार शिवाजीराव पाटील यांचा विचार झाला. तर राधानगरीतील आपले वर्चस्व कायम ठेवण्यासाठी ए. वाय. पाटील यांनी श्री. कवडे यांना संधी दिली. निवडीनंतर अध्यक्ष श्री. पाटील यांनी कारखाना ऊर्जितावस्थेत आणण्यासाठी सर्वही २५ संचालक एकसंध राहून कारभार करू. यासाठी कामगार आणि सभासदांनीही सहकार्य करावे आणि जास्तीत जास्त गाळप करून कारखाना सुस्थितीत आणण्यासाठी मदत करावी, असे आवाहन केले.

याप्रसंगी उपाध्यक्ष कवडे यांचेही भाषण झाले. या वेळी सर्व संचालकांसह कार्यकारी संचालक संजय पाटील, सेक्रेटरी उदय मोरे उपस्थित होते. सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी आर. डी. पाटील यांनी केले. निवडीनंतर अध्यक्ष-उपाध्यक्षांनी कारखाना स्थळावरील दिवंगत दादासाहेब पाटील (कौलवकर) यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. येथून अध्यक्ष पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी देवाळेपर्यंत मिरवणूक काढली. तर उपाध्यक्ष कवडे यांची मिरवणूक आवळीकडे रवाना झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana September Installment Update : लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट! सप्टेंबरचे पैसे कधी जमा होणार? जाणून घ्या संभाव्य तारीख

Ankita Sharma: साडी नेसून AK-47 मधून सलग ९ राऊंड फायर; IPS अंकिता शर्मांचा Video Viral, माजी लष्कर अधिकारी का भडकले?

दीपिकाने दुसऱ्या लेकीसाठी कॉपी केलं 'या' बॉलिवूड अभिनेत्रीच्या मुलीचं नाव? कमेंट करत म्हणाली- तुला इतकं नाव आवडलेलं...

Latest Marathi News Live Update : पुर्णेकरांच्या हत्येनंतर मुलाची पहिल्यांदाच पत्रकार परिषद, राम पुर्णेकरांकडून पुरावे केले सादर

Hasan Mushrif Virendra Mandlik : विरेंद्र मंडलिकांनी घेतले हसन मुश्रीफांचे आशीर्वाद, कागलचे राजकारण बदलणार?

SCROLL FOR NEXT