कोल्हापूर

आजरा - आंबोली रस्त्यावर टस्कराने पाडले माडाचे झाड

रणजित कालेकर

आजरा (कोल्हापूर) : आजरा - आंबोली (Aajra- Aamboli)मार्गावरील मसोली फाट्यानजीक टस्कराने भले मोठे माडाचे झाड पाडले. वाहनधारकांना वाहने चालवताना कसरत करावी लागत होती. दुपारपर्यंत तरी रस्त्यावरील हे झाड हटवण्यात आले नव्हते. त्यामुळे या मार्गावर एकेरी वाहतूक सुरू होती. वेळवट्टी व देवर्डे (Velvatti and Devarde)परिसरात टस्कर हत्तीने(Elephant)मोठा धुडगूस घातला आहे. (elephant-down-a-big-mada-tree-near-Masoli-fork-on-Ajara-Amboli-road-kolhapur-news)

शेतातील पिके फस्त करीत चाललाय आहे. त्यांच्या उपद्रवामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. त्याला रोखायचे कसे याची चिंता वनविभागाला आहे . उपद्रवाबरोबरच त्याचे विविध प्रतापही सध्या चर्चा आहे. शेतातील पाण्याच्या टाक्या फोडणे, ट्रॅक्टर ट्रॉली उलटून टाकणे,बैलगाडी फेकणे व तैमुरची फुटबॉल समजून खेळणे . त्याच्या या प्रतापामुळेही शेतकरी त्रस्त झाले आहेत. आज त्याने पहाटे मसोली फाट्याजवळ माडाचे झाड मोडून रस्त्यावर पाडले. त्यामुळे आजरा आंबोली मार्गावरील वाहतूकीला अडथळा आला. दुपारपर्यंत या मार्गावर एकेरी वाहतूक सुरू होती .वाहनधारक या मार्गावरील झाड हटवण्यासाठी बांधकाम विभागाला वारंवार संपर्क करत होते . झाडाचा विस्तार रस्ताभर पसरल्याने वाहनधारकांना कसरत करत वाहने चालवावी लागत होती .

झाडे पाडण्याचा सपाटा

अनेकदा आजरा आंबोली मार्गावरील दिशादर्शक फलक मोडून टाकले आहेत. आता तो झाडे पाडत सुटला आहे. त्याच्या या कृत्याने वनविभाग चिंतेत पडला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Education : विधान परिषदेत शिपायाच्या कंत्राटी पदावरून पेच; सत्ताधारी शिक्षक, पदवीधर आमदारांनीच केला सभात्याग

Ashadhi Ekadashi 2025: मुखात तुझे नाव, डोळ्यात तुझे गाव;डिगडोहमध्ये ‘विठ्ठल रखुमाईचा दर्शन सोहळा, माऊली ग्रुपचा उपक्रम

Ahilyanagar: 'श्रीरामपूरकरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्वागत'; ढोल-ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत जल्लोष

Pune Crime : सोसायट्यांच्या सुरक्षेचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर, कोंढव्यातील घटनेनंतर भीती; सीसीटीव्ही कॅमेरे, सुरक्षा यंत्रणेवरही प्रश्‍नचिन्ह

Ashadhi Wari 2025:'वरुणराजाच्या साक्षीने संत भेटीचा सोहळा'; बोंडले येथे संत तुकाराम महाराज व संत सोपानदेव महाराज यांची भेट

SCROLL FOR NEXT