'प्रवीण दरेकरांच्या सर्टिफिकेटची गरज नाही'

मंत्री जयंत पाटील यांचा टोला; कोल्हापुरात घेतला समाचार
'प्रवीण दरेकरांच्या सर्टिफिकेटची गरज नाही'

कोल्हापूर : विरोध पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) त्यांचे काम करीत आहेत, त्यांना सरकारचे कौतुक करणे शक्य नाही. तसेच पंतप्रधानांनी महाराष्ट्र सरकारचे कौतुक केले असताना विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेत्यांच्या सर्टिफिकेटची गरज नसल्याचा टोला जलसंपदा मंत्री जयंत पाटील (jayant patil) यांनी आज कोल्हापुरात (kolhapur) लगावला. कोल्हापूर जिल्ह्यातील उचंगी धरणातील प्रश्‍नांवर त्यांनी संबंधित धरणग्रस्त, लोकप्रतिनीधी, अधिकारी यांच्याशी चर्चा करून १५ जूनपर्यंत प्रश्‍न निकाली काढण्याचा निर्णय घेतला. जिल्हाधिकरी कार्यालयात बैठक झाल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी टिका केली. तर खासदार संभाजीराजे (sambhajiraje) राज्याला मराठा आरक्षणाबाबत (maratha reservation) काय घडले हे जनतेला समजावून सांगतिल असेही स्पष्ट केले.

माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देंवेंद्र फडणवीस कोकणवासियांना मदत मिळत नसल्याची टिका करतात यावर मंत्री पाटील म्हणाले, 'चक्रीवादळ झाल्यानंतर खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रत्यक्षात पाहणी केली आहे. गतवर्षीही मदत केली होती. आणि याही वर्षी मदत केली जाणार आहे. कोकणवासियांच्या पाठीशी सरकार ठाम उभे आहे. पंचनाम्यांची कामे सुरू असून लवकरच त्यांना योग्य मदत दिली जाईल. फडणवीस हे विरोधी पक्ष नेते आहेत. त्यामुळे त्यांना सरकारचे कौतुक करता येत नाही, त्यामुळे ते टिका करीत आहेत. ते त्यांचे काम करीत आहेत.'

'प्रवीण दरेकरांच्या सर्टिफिकेटची गरज नाही'
'मराठा आरक्षणाबाबत तत्काळ मार्ग काढा, अन्यथा वेगळा विचार'

विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर (pravin darekar) यांनी ट्वीट करून मुख्यमंत्री घरातून बाहेर पडत नाहीत, आणि उपमुख्यमंत्री पुण्याशिवाय बोलत नाहीत. अशी टिका केली आहे. यावर मंत्री पाटील म्हणाले, कोरोनातील मुंबईसारखी परिस्थिती (covid -19 sistuation) योग्य हताळली आहे. मुख्यमंत्र्यांनी दिवसरात्र लक्ष घालून कोरोना नियंत्रणात आणला. त्या खालोखाल पुणे शहर नियंत्रणात आले. राज्यातील परिस्थिती नियंत्रणात येत आहे. महाराष्ट्रात चांगले काम होत आहे. हे पंतप्रधानांना सुद्धा कळाले. त्यांनीही कौतुक केले. त्यामुळे महाराष्ट्रातील कामाला दरेकरांच्या सर्टिफिकेटची गरज नाही. त्यामुळे जनतेले आवाहन आहे की त्यांचे ट्वीट पाहत जावू नका." यावेळी खासदास संजय मंडलीक, चंदगडचे आमदार राजेश पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com