Finally entering the Corona in manchester city ichlkarnji kolhapur marathi news 
कोल्हापूर

अखेर महाराष्ट्राची वस्त्रनगरी इचलकरंजी हादरली..

संजय खूळ

इचलकरंजी (कोल्हापूर) :  महाराष्ट्राचे मँचेस्टर नगरी आणि मिनी भारत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इचलकरंजी शहरात अखेर कोरोना या संसर्गाने प्रवेश केलाच आहे. राज्यातील पाच लाख लोकसंख्येपेक्षा अधिक कमी लोकसंख्या असलेल्या शहरात सर्वाधिक दाट लोकवस्तीचे शहर म्हणून या शहराची ओळख आहे म्हणूनच या शहरात संसर्ग झाल्यास मोठा फैलाव होण्याची शक्यता होती. यासाठीच या शहरात दक्षता घेण्यात आली मात्र आज एक रुग्ण पॉझिटिव आल्याने शहर हादरून गेले आहे.


वस्त्रोद्योग मुळे जागतिक पातळीपर्यंत आपले नाव लौकिक केलेल्या या शहरात देशभरातील विविध प्रांतातील लोक या ठिकाणी स्थायिक झाले आहेत. उद्योजक, व्यापारी, कामगार ,कष्टकरी अशा विविध थरातील लोक देशातील वेगवेगळ्या भागातील आहेत. म्हणूनच या शहराला मिनी भारत म्हणूनही ओळखले जाते .या शहरात रोजगाराच्या मोठ्या संधी असल्यामुळे लोकसंख्येची वाढ मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तब्बल 27 चौरस किलोमीटर एरियामध्ये सुमारे तीन लाखाहून अधिक नागरिकांचे वास्तव्य आहे. याशिवाय 80 हजार ते एक लाख नागरिक दररोज कामाच्या निमित्ताने या शहरात येतात. त्यामुळेच प्रतिचौरस किलोमीटर दहा ते बारा हजार लोकांचे वास्तव्य या शहरात आहे


 कोरोनाची साथ देशात चालू झाल्यानंतर इचलकरंजी नगरपालिका आणि पोलिस प्रशासनाने अत्यंत गांभीर्याने या ठिकाणी योग्य ती दक्षता घेतली होती. नागरिकांचा जमाव जमू नये त्याचबरोबर झोपडपट्टी व औद्योगिक वसाहत असलेल्या भागात पालिकेने विविध उपाय योजना राबवल्या होत्या. बाहेरून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर या शहरात नजर ठेवण्यात आली होती.  गेली महिनाभर या शहराने कोरोना मुक्त राहून एक वेगळा संदेश दिला होता शहरातील नागरिकांनी ही प्रशासनाला चांगले सहकार्य करत संसर्ग वाढू नये यासाठी सर्वतोपरी मदत केली आहे.इचलकरंजी शहरात कर्नाटकचे मोठी कनेक्शन आहे महाराष्ट्र कर्नाटक च्या सीमेवरील एक मोठे गाव आणि कोल्हापूर जिल्ह्यातील कोल्हापूर पाठोपाठ सर्वाधिक लोकसंख्येचे गाव अशी या शहराची ओळख आहे.

कर्नाटकातून दोन वेळा संशयास्पद व्यक्ती आल्यामुळे या ठिकाणी आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली होती. ज्या भागात कर्नाटकातून काही नागरिक आले होते तो भाग सील करण्यात आला होता. काल सांगली येथे रुग्ण सापडल्यानंतर त्याच्याशी संबंधित दोन भाग कालपासूनच संपूर्णपणे सील करण्यात आले होते. मात्र आज सकाळी शहरातील कोले मळा परिसरात एक रुग्ण सापडला आणि प्रशासन हादरून गेले. या व्यक्तीचा संपर्क कोण कोणत्या भागात आहे कोणा कुणाशी आला आहे याबाबत तातडीने माहिती घेऊन उपाय योजना करण्यात येत आहेत. दाट लोकवस्ती असलेल्या या शहरात अखेर कोरोना प्रवेश केल्यामुळे शहरवासीयांच्या मध्ये अधिक घबराट निर्माण झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT