बेळगावात परीक्षा रद्द करण्याची सूचना यांना पडली चांगलीच महागात... 

सकाळ वृत्तसेवा 
Monday, 20 April 2020

दहावीची परीक्षा रद्द करून शैक्षणिक वर्षात झालेल्या परीक्षांच्या आधारे विद्यार्थांना गुणवत्ता श्रेणी द्यावी असा सल्ला दिल्या प्रकरणी शिक्षणाधिकाऱ्यांना नोटीस बजावण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. 

बेळगाव : दहावीची परीक्षा रद्द करून शैक्षणिक वर्षात झालेल्या परीक्षांच्या आधारे विद्यार्थांना गुणवत्ता श्रेणी द्यावी असा सल्ला दिल्या प्रकरणी शिक्षणाधिकाऱ्यांना नोटीस बजावण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. 

शिक्षण खात्याने 27 मार्च ते 9 एप्रिलपर्यंत दहावीची परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला होता मात्र कोरोनाच्या संकटामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.  तसेच 3 मेनंतर परीक्षेबाबत निर्णय घेण्यात येईल अशी माहिती देण्यात आली आहे त्यामुळे परीक्षा कधी होणार या चिंतेत विध्यार्थी अडकले आहेत त्यामुळे लॉकडाऊन काळात विद्यार्थांनी कशा प्रकारे अभ्यास करावा यासाठी मुख्याद्यापकांनी विध्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे अशी सूचना सातत्याने शिक्षण खात्यातर्फे करण्यात आलेली आहे. मात्र धारवाड विभागाचे अप्पर शिक्षण आयुक्त सिद्धलिंगय्या हिरेमठ यांनी चाचणी परीक्षेतील गुणांच्या आधारे दहावी विद्यार्थांचा निकाल   देण्यात यावा असा सल्ला दिला होता. 

हेही वाचा- कर्नाटकात 5 पॉझिटिव्ह ; दोघांचा बळी; बाधितांची संख्या झाली एवढी
 

अप्पर शिक्षण आयुक्तांना नोटीस बजावण्याचा निर्णय

दहावी परीक्षेबाबत अधिकाऱ्यांच्या बैठकीत हिरेमठ यांनी धारवाड विभागात 2 लाख 60 हजार विद्यार्थी परीक्षा देणार आहेत मात्र सध्याच्या स्थितीत परीक्षा काळात सामाजिक अंतर पाळणे शक्क होणार नाही असा सल्ला देत परीक्षा रद्द करण्याची मागणी केली होती तसेच या बाबतची प्रत सोशल मीडियावर टाकण्यात आला होती हे  निदर्शनास येताच सरकारच्या नियमांचे पालन करणे हे अधिकाऱ्यांचे काम आहे मात्र अप्पर शिक्षण आयुक्तांनी नियमाचे उल्लंघन केले आहे त्यामुळे त्यांना नोटीस बजावण्यात येणार आहे अशी माहीती शिक्षण मंत्री एस सुरेशकुमार यांनी दिली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: decision to issue notice to upper education commissioner belgaum marathi news