Bamboo Splitter 
कोल्हापूर

बांबूची कापणी होणार सोपी! 'संत गजानन' अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी बनवले 'बांबू स्प्लिटर' मशीन

सकाळ डिजिटल टीम

महागाव : येथील संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या अंतिम वर्ष मेकॅनिकल विभागामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी बांबू स्प्लिटर मशीन प्रकल्प तयार केला आहे. सध्या बांबू हा अभियांत्रिकी मध्ये धातूला पर्याय म्हणून वापर केला जात आहे. भविष्यात या प्रकल्पामध्ये आधुनिकीकरण करून त्याचा जास्तीत जास्त फायदा बांबू उद्योग व प्रक्रियेत कसा करता येईल यादृष्ठीकोनातून संशोधन चालू आहे.

बाजारात बांबूला वाढती मागणी असून त्यामुळे बांबू लागवड वाढीस लागलेली आहे. बांबू पासून कंपोझिट मटेरियल, फर्निचर, कागद, कापड, सौंदर्य प्रसाधने बनवता येतात. अशा प्रकारची मशीन तयार करणे ही काळाची गरज ओळखून विद्यार्थ्यांनी, प्रथम बांबू प्रक्रिया व उद्योग यातील समस्या जाणून घेतल्या. यासाठी प्रथम अश्वघोष बांबू रोपवाटिका, पेरणोली (ता.आजरा) व बांबोरियम येथे भेटी दिल्या.

ऋतुराज धातुंडे, अनिकेत चौगले, भूषण हलबगोळ ,उत्कर्ष बर्गे या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या या प्रकल्पामध्ये बांबू चार भागांमध्ये उभा कापला जातो यासाठी एक एच.पी. मोटर चा वापर केला असून तो सिंगल फेजवर चालू शकते. त्यासाठी व्हीएफडी उपकरण वापरले आहे. तसेच रीडक्शन गिअर बॉक्सचा वापर केला आहे. एका मशीनवर आपण बांबूसंबंधी तिन्ही कामे करू शकतो. तसेच या प्रकल्पावर शोध प्रबंध तयार करण्याचे काम चालू असून भविष्यात मोटरची शक्ती व मशीनची लांबी वाढवून आपण मोठे बांबू तुकडीकरण व कापणी करू शकतो.

यासाठी प्रकल्प मार्गदर्शक प्रा.अतुल देशपांडे, प्रा.व्ही.आर. घाडगे, प्राचार्य डॉ. एस. एच. सावंत ,श्री.विश्वजीत कमलाकर (हुपरी) व श्री. सतीश कांबळे (पेरनोली) यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य मिळाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT