Kalamba Lake is polluting the water kolhapur marathi news 
कोल्हापूर

कोल्हापूरच्या कळंबा तलावाचा श्वास का गुदमरतोय...?

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - कळंबा तलावालगतची वाढती बांधकामे आणि प्रदूषणाचा फटका तलावाला बसू लागला असून पाणीशुद्धकरणासाठी डोस वाढविण्याची वेळ ग्रामपंचायतीवर येऊन ठेपली. तलावातून पाणी उचलल्यानंतर या प्रमाणात शुद्धीकरणाची यंत्रणा राबवावी लागत होती त्यापेक्षा अधिक डोस फेब्रुवारीपासून द्यावा लागणार आहे.

कळंबा तलावाचे पाणी होतंय प्रदूषीत 

शहराच्या वैभवात भर पाडणारा तलाव प्रदूषणाच्या विळख्यात सापडत चालला आहे. प्राधिकरण बांधकामाबाबत कोणतीही ठोस भुमिका घेऊ शकत नसल्याने बांधकामाचे मजल्याचे मजले चढू लागले आहेत. कळंबा गावासह, पाचगाव तसेच शहराला तलावातून पाणीपुरवठा होतो. यंदाच्या पावसाळ्यात तलाव ओव्हरफुल्ला होऊनही पाण्याची प्रदूषण काही कमी होत नसल्याचे चित्र आहे. कळंब्याला सध्या दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे.

परिसरात बांधकामे, वस्ती वाढल्याचा परिणाम

पाण्याचे शुद्धीकरण होऊनही ते अपेक्षेप्रमाणे शुद्ध होत नसल्याने ग्रामस्थांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्‍यता आहे. काही ठिकाणी नळाला गढूळ पाणी येत असल्याने ग्रामस्थांच्या दृष्टीने हा चिंतेंचा विषय ठरला आहे. सध्या पाण्याच्या प्रक्रियेस पुरेसा डोस मिळत आहे, मात्र तलावातील पाण्याची अशीच स्थिती राहिल्यास नाईलजाने पाणीशुद्धीकरणाचा डोस वाढवावा लागणार आहे. पावडर तसेच तुरटीच्या माध्यमातून पाणी शुद्ध केले जाते. महापालिका पाणीपुरवठा विभागातून निवृत्त कर्मचारी सध्या ही व्यवस्था पाहत आहे. रंकाळा तलावानंतर कळंबा हा शहर तसेच लगतच्या परिसराच्या वैभवात भर टाकत आला आहे. कळंबा नाका ते कात्यायनी घाटा पर्यंत बांधकामे वाढणार नाहीत, असा तर्क बांधला जायचा. मात्र तलावाच्या पाणलोट क्षेत्रात बांधकामाचा जोर वाढू लागला आहे. ग्रामपंचायतीने संबंधिताना नोटिसाही दिल्या. भविष्यातील तलावाला धोका काय आहे. हे प्राधिकरणाच्या ध्यानात येत नसल्याचे ग्रामपंचायतीचे म्हणणे आहे. पाणलोट क्षेत्र कमी झाल्यास पाण्याचा साठा कमी होईल. त्यामुळे भविष्यात पावसाळ्यात पाणी साठेल तेवढे साठेल नंतर ते टिकेल की याची हमी देता येत नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. लगतच्या पंचक्रोशीत जो तो उठतो आणि हॉटेल टाकतो, असे चित्र निर्माण झाले आहे. काही हॉटेलच्या दारात रात्री गाड्या लावायला जागा नसते असे चित्र हमखास नजरेस पडत आहे. महापूरात पाण्याचा फुगवटा निर्माण झाल्यानंतर बांधकामांची चर्चा होते. 

कळंबा तलावाच्या पाणलोट क्षेत्रातील वाढत्या बांधकामाबाबत पूर्वीही तक्रारी केल्या पण त्याची दखल घेतलेली नाही. तलावातील पाण्याची गुणवत्ता कमी झाली असून पाणी शुद्धीकरणासाठी जादाचा डोस द्यावा लागेल की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. बांधकामे आणि त्यातून बाहेर पडणारे सांडपाणी वेळीच न रोखल्यास भविष्यात गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल.
- सागर भोगम, सरपंच

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra NCC Crisis: राज्य सरकारच्या लालफीतशाहीमुळे एनसीसी विस्ताराला ब्रेक; दीड लाख छात्रांसाठी स्वतंत्र प्रशिक्षण अकादमीचा अभाव, ४०-६० टक्के पदे रिक्त

Latest Marathi News Live Update : उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर बोलावली तातडीची बैठक...

Mulshi Aadhaar: आधार अपडेटअभावी मुळशीतील १,२४६ विद्यार्थी अडचणीत; ३० सप्टेंबरच्या डेडलाइनने प्रशासनाची परीक्षा

Kannad Ambadi Dam Water Crisis: अंबाडी धरणातील पाणीसाठा फक्त ८.९१ टक्के; जानेवारीनंतर कन्नड शहर व परिसरात तीव्र पाणीटंचाईची शक्यता

Leopard Attack Nirgudsar: निरगुडसरमध्ये बिबट्याचा हल्ला; ब्रिडिंगसाठी आणलेला ६० हजारांचा बोकड व मेंढी ठार

SCROLL FOR NEXT