burning car esakal
कोल्हापूर

कोल्हापूर : आंबोली मार्गावर बर्निंग कारचा थरार

या रस्त्यावरून येणारी वाहने आणि पहाटे फिरायला जाणाऱ्यांची गर्दी होती.

रणजित कालेकर

आजरा - आजरा आंबोली मार्गावर वेळवट्टी नजीक एका चालत्या कारने अचानक पेट घेतल्याने या मार्गावर पहाटे वाहनधारकांना बर्निंग कारचा थरार पहायला मिळाला. आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून सुमारे सहा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. तासाभरातच ही गाडी पूर्णपणे जळून खाक झाली आहे. चालक व गाडीतील प्रवाशांनी प्रसंगावधान राखून आपला जीव वाचवला असल्याची माहिती मिळाली आहे.

दरम्यान, रामप्रसाद नरहरी कावळे (वय ३२) रा. गणेशनगर (ता. जालना ) यांनी या घटनेची आजरा पोलिसांत माहिती दिली आहे. कावळे महिंद्रा कंपनीची xuv500 (एमएच ४६ पी ५६१२) या कारने सावंतवाडीहून आजराकडे येत होते. वेळवट्टी नजीक अचानक चारचाकीने पेट घेतला. प्रसंगावधान राखत त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी आपला जीव वाचवला. सुमारे तासभरात काळ जळून खाक झाली. या रस्त्यावरून येणारी वाहने आणि पहाटे फिरायला जाणाऱ्यांची गर्दी होती. सर्वत्र धूर व आगीच्या ज्वाळा लांबूनही दिसत होत्या. पोलिस हवलदार दत्ता शिंदे अधिक तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM-Kisan Samman Nidhi: पीएम किसान योजनेचा २३वा हप्ता रखडणार? नवे नियम काय आहेत?

Pune Drug Bust: चौफुला-धायगुडेवाडी येथे २९ किलो गांजासह २०.३० लाखांचा मुद्देमाल जप्त; यवत पोलिसांची धडक कारवाई

MI vs RR Live : ३ तासांची प्रतीक्षा अन् मुंबई इंडियन्स-राजस्थान रॉयल्स सामना सुरू होणार; किती षटकांची मॅच, किती वाजता?

Shaktipith Highway route villages : शक्तिपीठ महामार्ग कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग, सातारा, सोलापूर जिल्ह्यातील गावांची यादी आली; असा आहे मार्ग

Maharashtra Education DA Arrears: शिक्षक व कर्मचाऱ्यांना जुलै २०२५ ते ऑक्टोबर २०२५ महागाई भत्ता थकबाकी मार्च २०२६ च्या वेतनासह देण्याचे शिक्षण संचालकांचे आदेश

SCROLL FOR NEXT