'सावित्रीमाईवर शेण फेकणारे अन् हिजाबच्या ‌निमीत्तानं गोंधळ घालणारे एकच'

काही राजकीय नेत्यांनी या वादात उडी घेत सुरु असलेल्या घटनांवर टीका केली आहे.
रुपाली ठोंबरे पाटील
रुपाली ठोंबरे पाटील
Updated on
Summary

काही राजकीय नेत्यांनी या वादात उडी घेत सुरु असलेल्या घटनांवर टीका केली आहे.

मागील दोन ते तीन दिवसांपासून हिजाब (Hijab) या विषयावरून कर्नाटकसह (Karnataka Government) देशातील वातावरण तापलं आहे. याप्रकरणी सत्ताधारी भाजप (BJP) आणि काँग्रेस पक्ष (Congress Party) आमनेसामने आहेत. दरम्यान, यावर अनेक उलट-सुलट प्रतिक्रिया येत आहेत. काही राजकीय नेत्यांनी या वादात उडी घेत सुरु असलेल्या घटनांवर टीका केली आहे. दरम्यान, आत रुपाली पाटील ठोंबरे यांनीही ट्वीट करुन भाजपावर निशाणा साधला आहे.

रुपाली ठोंबरे पाटील
'काँग्रेसने बिपीन रावतांना गुंड म्हटलं, त्यानंतर...'; PM मोदींचा गंभीर आरोप

यात त्या म्हणतात, सावित्रीमाई फुले व फातिमा शेख यांच्या अंगावर शेण फेकणारे व हिजाबचं ‌निमीत्त करून‌‌ महिला शिक्षणात अडथळे आणनारे एकाच विचारसरणीचे लोक आहेत. जाती-पात आणि धर्माच्या भिंती तोडून महिला सन्मानासाठी सर्व धर्माचे लोक उभा राहत आहे. हा माझा खरा भारत आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. आता रुपाली ठोंबरे पाटील (Rupili Patil-Thombare ) यांच्या या टीकेनंतर नव्या वादाला तोंड फुटणार का याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

काय आहे ही घटना

मंगळवारी कर्नाटकातील उडुपी जिल्ह्यातील मणिपाल येथील महात्मा गांधी मेमोरियल कॉलेजमध्ये (Mahatma Gandhi Memorial College) भगवी शाल आणि हिजाब घातलेल्या विद्यार्थिनींच्या दोन गटांनी एकमेकांच्या विरोधात घोषणा दिल्यानं तणाव वाढला. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओत मुलांचा एक गट मंड्यामध्ये हिजाब परिधान केलेल्या मुलीसोबत गैरवर्तन करताना दिसत होते. मात्र, सोशल मीडियावर या मुलीच्या बाजूनं समर्थनाचा वर्षाव झाला आहे. हिजाब (Hijab) घालण्याच्या मागणीसाठी आपला विरोध सुरू ठेवण्याचा आग्रह धरणाऱ्या मुलीनं सांगितलं, की तिला शिक्षकांचा पाठिंबा आहे. आता या घटनेमुळे काही काळासाठी देशातील वातावरण पुन्हा बिघडले आहे.

रुपाली ठोंबरे पाटील
काळ वेळ बघून उत्तर देऊ; नितेश राणेंच्या कारवाईवर फडणवीसांची प्रतिक्रिया

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Latest Marathi News Live Update
IMD predicts heavy rainfall
State Government Revamps Land Acquisition System; 103 Officer Posts Reorganized
Travel Alert: Pune–Mumbai Passengers Face Delays as 25 Trains Take Alternate Route
Marathi News Esakal
www.esakal.com