Kolhapur Politics Hasan Mushrif  esakal
कोल्हापूर

Kolhapur Politics : 'अजून दोन टर्म मीच आमदार होणार'; पत्रकारांनी 'तो' प्रश्न विचारताच मुश्रीफांनी जोडले हात!

मी अजूनही दोन टर्म येथेच आमदार होणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

मराठा समाजाला आरक्षण देण्यास शासन सकारात्मक आहे. त्यासाठी ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये, याची काळजी शासन घेत आहे.

कोल्हापूर : ‘मी अजूनही दोन टर्म येथेच आमदार होणार आहे. तालुक्यातील जनतेची सेवा करायची आहे’, असा मनोदय पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी पत्रकारांनी विचारलेल्या खासदार होणार का? या प्रश्नावर बोलताना व्यक्त केला.

दरम्यान, पत्रकारांनी पहिल्यांदा तुम्ही एकच टर्म आमदार होणार, असे सांगितले होते, याची आठवण करून देताच त्यांनी हसत हसतच पत्रकारांना हात जोडले. महायुतीतील मंत्रिपदावरच खूश असल्याचे त्यांनी सांगितले.

इंडिया आघाडीच्या आंदोलनाबाबत मुश्रीफ म्हणाले, ‘मला दिल्लीतील घडामोडींची फारशी माहिती नसते. सकाळी लोक माझ्याकडे विविध समस्या घेऊन येतात, त्यांच्याशी संवाद साधतो. त्यामुळे दिल्लीत काय झाले, हे सकाळच्यावेळी समजून घेऊ शकत नाही. मराठा समाजाला आरक्षण देण्यास शासन सकारात्मक आहे. त्यासाठी ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये, याची काळजी शासन घेत आहे.

त्याचाच भाग म्हणून जरांगे-पाटील यांच्या उपोषणानंतर राज्यातील अनेक मराठा कुटुंबांना कुणबी दाखले मिळाले आहेत. त्यामुळे जरांगे व मंत्री भुजबळ यांनी हा मुद्दा जास्त लावून धरू नये.’ दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांनी भाजप लोकसभेच्या सर्व जागा लढवणार असल्याचे सांगितले आहे. याबाबत मुश्रीफ यांना विचारले असता ते म्हणाले,‘ शिंदे गट, राष्‍ट्रवादी कॉंग्रेस, भाजप यांच्यात भांडण लावण्याचा आव्हाड प्रयत्न करीत आहेत.’

मास्कची सक्ती नाही

‘राज्यात ‘जे एन १’ हा कोरोनाचा नवा व्हेरिएंट आला आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व अधिष्ठाता, जिल्हाधिकारी यांची बैठक घेऊन आपापल्या जिल्ह्यात खबरदारी घ्यावी, वैद्यकीय सुविधा सज्ज ठेवावी तसेच औषधसाठा तयार ठेवावा, आदी सूचना दिल्या आहेत. हा खबरदारीचा भाग आहे. मात्र घाबरण्याचे कारण नाही. मास्कची सक्ती केलेली नाही. मात्र ज्यांना आजाराची लक्षणे आहेत, त्यांनी मास्कचा वापर करावा,’ असेही मुश्रीफ यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना चॅलेंज देणारा सुशील केडिया कोण आहे? कसे कमावले कोट्यवधी रुपये?

IND vs ENG 2nd Test: Ohhh NO! शुभमन गिलच्या डोक्यावर चेंडू जोरात आदळला, डॉक्टरांची मैदानावर धाव अन्...

VIRAL VIDEO: यांना 'महाराष्ट्र केसरी' म्हणावं की दुसरं काही! दोन घोरपडीमध्ये रंगली दंगल, व्हिडिओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल

Alternative Careers: 9 ते 5 च्या ठराविक नोकरीला कंटाळला आहात? मग 'हे' 8 करिअर पर्याय तुमच्यासाठी ठरू शकतात योग्य पर्याय!

Viral: पैसे उधार घेणाऱ्यांनो लक्ष द्या...! उसने घेतलेली रक्कम वेळेत परत केली नाही तर होणार जेल अन्..., न्यायालयाचा निर्णय

SCROLL FOR NEXT