'सात दिवसांत पालकमंत्री, आमदार, अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा'; छ. संभाजी महाराजांच्या स्मारकावरुन हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

पापाची तिकटी येथील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारक (Chhatrapati Sambhaji Maharaj Memorial) अपूर्ण असताना चुकीच्या पद्धतीने उद्‍घाटन केले.
Chhatrapati Sambhaji Maharaj Memorial Papachi Tikati
Chhatrapati Sambhaji Maharaj Memorial Papachi Tikatiesakal
Summary

हिंदू समाजाच्या भावना दुखावण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला आहे. महापालिकेची जबाबदारी असताना या नेत्यांनी उद्‍घाटन केले कसे?

कोल्हापूर : पापाची तिकटी येथील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारक (Chhatrapati Sambhaji Maharaj Memorial) अपूर्ण असताना चुकीच्या पद्धतीने उद्‍घाटन केले. त्याबाबत सात दिवसांत महापालिकेने पालकमंत्री, आमदार, माजी नगरसेवक, महापालिका अधिकारी, ठेकेदारावर गुन्हे दाखल करावेत. अन्यथा कोल्हापूरबरोबरच कागलमधीलही विकासकामांची उद्‍घाटने केली जातील, असा इशारा हिंदुत्ववादी संघटनांनी (Hindu Association) महापालिकेला दिला.

विविध हिंदुत्ववादी संघटनांतर्फे महापालिकेला निवेदन देऊन सात दिवसाची मुदत दिली आहे. उपायुक्त शिल्पा दरेकर यांना प्रकरणाचे गांभीर्य पटवून दिले आहे. निवेदनात म्हटले आहे, अनेक वर्षांपासून हिंदू समाज व संघटना स्मारकासाठी झटत आहेत. त्याचे काम अजूनही अपूर्ण आहे. पण राजकीय स्वार्थापोटी श्रेय लाटण्यासाठी काही नेत्यांनी उद्‍घाटन केले.

Chhatrapati Sambhaji Maharaj Memorial Papachi Tikati
'कर्नाटकच्या राजकारणातही एकनाथ शिंदे-अजित पवार, त्यामुळं काहीही घडू शकतं'; माजी मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याने खळबळ

त्यातून हिंदू समाजाच्या भावना दुखावण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला आहे. महापालिकेची जबाबदारी असताना या नेत्यांनी उद्‍घाटन केले कसे? महापालिकेने गुन्हे दाखल का केले नाहीत? या बेकायदेशीर कार्यक्रमाला महापालिकेचे काही अधिकारी व ठेकेदाराने साथ दिली. त्यांच्यावरही कारवाई व्हायला हवी.

Chhatrapati Sambhaji Maharaj Memorial Papachi Tikati
'कृष्णात माझं बाळ, आहे थोराच्या संगतीचं'; 'रिंगाण'च्या यशानंतर कादंबरीकाराच्या आईनं व्यक्त केली भावना

निवेदन देऊन चर्चा केल्यानंतर गजानन तोडकर यांनी महापालिका प्रशासनाला गुन्हे दाखल करण्याची सात दिवसांची मुदत दिली आहे. या कालावधीत वरळीमध्ये जसे आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला. त्याप्रमाणे येथे गुन्हे दाखल झाले, नाहीत तर आठव्या दिवसांपासून शहरातील व कागलमधील कामांची उद्‍घाटने हिंदू समाज करेल, असे सांगितले. यावेळी महेश उरसाल, अजित ठाणेकर, उदय भोसले, हिंदूराव शेळके, किशोर घाटगे, पंडीत पोवार, मनोहर सोरप आदी उपस्थित होते.

Chhatrapati Sambhaji Maharaj Memorial Papachi Tikati
शिवराज्याभिषेक ही महाराष्ट्राच्या इतिहासातील तेजस्वी घटना; ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांचं मत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com