Kolhapur rane Agitation 
कोल्हापूर

राणे सुधारले नाहीत, तर त्यांना घरात जाऊन जाळू ; शिवसैनिकांचा इशारा

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांविरुद्ध केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद आज राज्यभरासह कोल्हापूरमध्ये देखील उमटले. शहरामध्ये शिवसेनेच्या वतीने राणें यांच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करत त्यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी माध्यमांशी संवाद साधताना राज्याचे मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विरुद्ध वादग्रस्त विधान केले. त्यांच्या या वक्तव्याचे तीव्र पडसाद राज्यभरामध्ये उमटू लागले आहेत.

आज कोल्हापूर मधील बिंदू चौक ते लक्ष्मीपुरी पोलीस ठाणे येथपर्यंत शिवसेना  जिल्हाप्रमुख आणि पदाधिकाऱ्यांनी मोर्चा काढत तीव्र घोषणाबाजी केली. या वेळी राणेंच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आले. यावेळी जिल्हाप्रमुख संजय पवार व विजय देवणे यांनी घटनेचा तीव्र निषेध करत भाजपने राणेंना फक्त शिवसेनेविरुद्ध बोलण्यासाठीच घेतले आहे. मुळातच ज्या शिवसेनेच्या जीवावर त्यांनी सर्वोच पदे अनुभवलेत ती कृपा तरी राणेंनी विसरू नये. भाजपची लाचारी पत्करून शिवसेनेवर आणि मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्यावर टीका करणे हे खाल्या मिठाला जागण्याचे लक्षण नाही आहे. राणे कुटुंबावर शिवसेनेचे उपकार असून त्यांनी त्याची जाण ठेवावी असेही ते यावेळी बोलले.

तसेच राणेंवर राज शिष्टाचार भंग करणे , समाजामध्ये तेढ निर्माण करणे, अनादरपूर्वक वक्तव्य करणे या आधारे गुन्हा नोंद करण्याची मागणी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यामध्ये जाऊन करवीरचे पोलीस उपाधीक्षक आर.आर.पाटील व लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनिल गुजर यांच्याकडे केली. यावर लेखी तक्रार द्या योग्य ती कारवाई करू असे आश्वासन या वेळी पोलिसांनी आंदोलकांना दिले. यावेळी सुजित चव्हाण, शिवाजी जाधव, हर्षल सुर्वे,मनजीत माने, रणजित आयरेकर,विनोद खोत,दीपक पोपटानी, राजू सांगावकर, पोपट दांगट, दिनेश परमार,विराज पाटील,सुरेश साळोखे,राजू जाधव,शशी बिडकर,विशाल देवकुळे,स्मिता सावंत,दीपाली शिंदे,पूजा शिंदे आदी उपस्थित होते.

नारायण राणेंच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आले.

आज पुतळा जाळला आहे जर राणे सुधारले नाहीत तर त्यांना घरात जाऊन जाळू असा इशारा आंदोलन प्रसंगी जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी दिला.

पोलिसांनी राणेंवर कायदेशीर कारवाई न केल्यास गुरुवारी पोलीस ठाण्यासमोर आंदोलन करू असा इशारा या वेळी आंदोलकांनी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT