Kolhapur-Tirupati Flight esakal
कोल्हापूर

तिरुपती बालाजीला जाताय? मग, ही बातमी आधी वाचा; कोल्हापुरातून थेट विमानसेवा झालीये बंद, काय आहे कारण?

कोल्हापूरहून (Kolhapur Airport) तिरुपतीला जाणाऱ्या भाविकांची संख्या अधिक आहे.

सकाळ डिजिटल टीम

कोल्हापुरातील भाविकांची सोय लक्षात घेऊन विमानतळ प्राधिकरणाने हैदराबादला जाणारे विमान पुढे तिरुपतीला न्यावे, अशी विनंती कंपनीला केली.

कोल्हापूर : अपुरी प्रवास संख्या असल्याने कोल्हापूर-तिरुपती (Kolhapur-Tirupati Flight) ही थेट सेवा सुरू ठेवण्यास विमान कंपनीने (Airline Company) असमर्थता दर्शवली. त्यामुळे विमान प्राधिकरणाने त्यांना हैदराबादमार्गे तिरुपती सेवा सुरू ठेवण्याची विनंती केली. त्यामुळे आता कोल्हापूर-हैदराबाद-तिरुपती अशी विमानसेवा आज (ता. १५) पासून सुरू होणार आहे, अशी माहिती प्राधिकरणाने दिली.

कोल्हापूरहून (Kolhapur Airport) तिरुपतीला जाणाऱ्या भाविकांची संख्या अधिक आहे. ही बाब लक्षात घेऊन कोल्हापूर-तिरुपती ही विमानसेवा सुरू करण्यात आली. मात्र, काही कालावधीनंतर प्रवाशांची संख्या सातत्याने अपुरी असल्याचे विमान कंपनीच्या लक्षात आले. त्यामुळे ही सेवा व्यवहार्य नसून ती बंद करणार असल्याचे विमान कंपनीने विमानतळ प्राधिकरणाला कळवले.

तसेच शुक्रवार (ता. १५) पासून ही सेवा बंद होणार असल्याचे निश्चित झाले. मात्र, कोल्हापुरातील भाविकांची सोय लक्षात घेऊन विमानतळ प्राधिकरणाने हैदराबादला जाणारे विमान पुढे तिरुपतीला न्यावे, अशी विनंती कंपनीला केली. त्यांनी ती मान्य केली. त्यामुळे आता कोल्हापूर-हैदराबाद-तिरुपती अशी विमानसेवा सुरू होणार आहे. यामुळे प्रवासाचा कालावधी जरी वाढणार असला तरी विमानसेवा सुरू राहाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ramlila Maidan Protest: रामलीला मैदानाचं एका दिवसाचं भाडं 1 लाख 21 हजार रुपये; पण यावर्षी केवळ तीनच दिवस उपलब्ध

सचिनचा 'अजिंक्य' मानला जाणारा विक्रम मोडला जाणार? ECB चा मास्टरस्ट्रोक, Joe Root सोबत केला खास करार

Karmad News : पीएम धन-धान्य कृषी योजनेतील कामगिरीबद्दल जिल्ह्याचा दिल्लीत गौरव

CJI Surya Kant: ''..तर राजीनामा द्या!'' काँग्रेसची सरन्यायाधीशांवर पोस्ट, गदारोळ होताच पोस्ट डिलीट

MPSC Student Agitation : आंदोलन थांबले, पण असंतोष कायम; ‘एमपीएससी’ अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी अपूर्णच

SCROLL FOR NEXT