light bill
light bill  sakal
कोल्हापूर

75 पैसे वीज सवलतीचा प्रश्न लवकरच मार्गी - अस्लम शेख

सकाळ वृत्तसेवा

इचलकरंजी : राज्यातील 27 एचपीवरील यंत्रमाग घटकांच्या 75 पैसे अतिरिक्त वीज बील सवलतीचा प्रश्न लवकरच मार्गी लावण्यात येईल, असे ठोस आश्वासन वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख यांनी दिले. आॅनलाईन नोंदणीतील तांत्रिक कारणांमुळे रद्द करण्यात आलेली वीज सवलत पूर्ववत सुरु केल्याबद्दल मंत्री शेख यांचा मुंबईत आज इचलकरंजीतील यंत्रमागधारक संघटना, महाविकास आघाडी यांच्यातर्फे सत्कार करण्यात आला. खासदार धैर्यशील माने आणि पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते कोल्हापूरी फेटा व महालक्ष्मीची मूर्ती देऊन हा सत्कार करण्यात आला.

वीज सवलतीसाठी 27 एचपीवरील यंत्रमागधारकांना ऑनलाईन नोंदणी सक्तीची करण्यात आली होती. परंतु तांत्रिक अडचणीमुळे नोंदणी करताना येणार्‍या अडचणीमुळे अनेकांनी नोंदणी केलीच नाही. त्यामुळे ज्यांनी नोंदणी केलेली नाही त्यांची वीज सवलत रद्द करण्याचा आदेश वस्त्रोद्योग विभागाने दिला होता. त्यामुळे वाढीव दराने वीज बिले आल्याने यंत्रमागधारक हवालदिल झाले होते. अशावेळी महाविकास आघाडीची नेतेमंडळी व यंत्रमागधारक संघटनांनी पाठपुरावा केल्यानंतर वस्त्रोद्योग मंत्री शेखइचलकरंजीत आले होते. यावेळी त्यांनी कार्यक्रमात वीज सवलत रद्दच्या आदेशाला स्थगिती देत ऑनलाईन नोंदणीसाठी मुदतवाढ जाहीर केली. याबद्दल महाविकास आघाडी आणि इचलकरंजीतील सर्व यंत्रमाग संघटनांच्या वतीने नामदार शेख यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी खासदार माने आणि इचलकरंजी इंडस्ट्रीयल इस्टेटचे चेअरमन राहुल खंजिरे यांनी यंत्रमागधारकांच्या विविध प्रश्नांचा आढावा घेतला. वीज सवलतीचा प्रश्‍न ज्याप्रमाणे मार्गी लावला. त्याचप्रमाणे 75 पैसे अतिरिक्त सवलतीचा प्रलंबित प्रश्‍न मार्गी लावून त्याचा लाभ यंत्रमागधारकांना तातडीने मिळवून द्यावा, अशी आग्रही मागणी केली. त्याचबरोबर वस्त्रोद्योगाशी निगडीत सर्वच प्रश्‍न सोडवून अडचणीच्या गर्तेतील यंत्रमाग व्यवसायाला ऊर्जितावस्था द्यावी, असे साकडे घातले.

यावेळी प्रदेश काँग्रेस सचिव शशांक बावचकर, शहर काँग्रेचे अध्यक्ष संजय कांबळे, शिवसेनेचे नेते रविंद्र माने, सयाजी चव्हाण, भाऊसो आवळे, इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशनचे अध्यक्ष सतीश कोष्टी, सागर चाळके, जागृती यंत्रमागधारक संघेटनेचे विनय महाजन, इस्लोचे गोरखनाथ सावंत, एअरजेट लूम असोसिएशनचे राजगोंडा पाटील, प्रकाश गौड, चंद्रकांत पाटील, सुरज दुबे, सुभाष मालपाणी आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : स्वाती मालीवाल मारहाणीप्रकरणी दिल्ली पोलीस अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी

IPL 2024 : 'तुम्ही मला अन् धोनीला शेवटच एकत्र खेळताना...' RCB vs CSK सामन्यापूर्वीच विराट कोहलीच्या वक्तव्याने उडाली खळबळ

NASA Mission : पृथ्वीच्या वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी NASAची ध्रुवीय प्रदेश मोहिम!

Super-Rich Club: जगातील अतिश्रीमंतांची संख्या वाढली; यादीत गौतम अदानींचे कमबॅक, नंबर एक वर कोण?

Mumbai Loksabha: मुंबईची लढत का आहे इतकी इंट्रेस्टींग? वाचा संपूर्ण आकडेवारी

SCROLL FOR NEXT