मानवतेसाठी मदतीचा हात! भारताने पाकिस्तानमार्गे अफगाणिस्तानला पाठवलं धान्य

महागाई, गरीबी आणि अन्नधान्याच्या टंचाईचा सामना करणाऱ्या अफगाणिस्तानला भारताने मदतीचा हात दिला आहे.
Wheat
WheatSakal

महागाई, गरीबी आणि अन्नधान्याच्या टंचाईचा सामना करणाऱ्या अफगाणिस्तानला भारताने मदतीचा हात दिला आहे. भारताने आज पाकिस्तानमार्गे अफगाणिस्तानला ५० हजार मेट्रिक टन गहू पाठवत आहे. हे धान्य परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला यांनी हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं. भारताच्या या मदतीमुळे अफगाणिस्तानच्या नागरिकांनी आभार व्यक्त केले आहेत. (India Supply Wheat Afghanistan)

भारताकडून पाठवण्यात येणारा गहू हा पाकिस्तानमार्गे अफगाणिस्तानला जाणार आहे. अट्टारी वाघा सीमेवरून पाठवण्यात येणाऱ्या गव्हाच्या ट्रकबाबत भारताने ट्रान्झिट सुविधेसाठी विनंतीही केली होती. यावर २४ नोव्हेंबर २०२१ रोजी पाकिस्तानने उत्तर दिलं होतं.

Wheat
सरकारचा अहवाल वाचलेला नाहीये, विलीनीकरणावर अद्याप निर्णय नाही: परब

याआधी काही दिवसांपूर्वी भारताने अफघाणिस्तानला जवळपास अडीच टन वैद्यकीय साहित्य आणि कपडे पाठवले होते. गेल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अफगाणिस्तानमध्ये राहणाऱ्या शीख हिंदूंच्या प्रतिनिधींची भेट घेतली होती. भविष्यात सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन मोदींनी दिलं होतं.

गेल्या महिन्यात भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने मानवतेच्या दृष्टीकोनातून अफगाणिस्तानच्या लोकांना मदत करणार असल्याचं सांगितलं होतं. माध्यमांशी बोलताना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी सांगितलं होतं की, भारत सरकार मानवतेच्या नात्याने अफगाणिस्तानच्या नागरिकांना धान्य, कोरोना लस आणि इतर औषधे उपलब्ध करून देण्यास कटीबद्ध आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com