Kolhapur Bandh  esakal
कोल्हापूर

Kolhapur Bandh : कोल्हापुरात इंटरनेट बंद करण्याचे मोबाईल कंपन्यांना आदेश; पोलीस अधिक्षकांची माहिती

आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केल्याप्रकरणी कोल्हापुरात हिंदुत्ववादी संघटना (Kolhapur Hindu Association) आक्रमक झाल्या आहेत.

सकाळ डिजिटल टीम

जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित कंपन्यांना इंटरनेट बंद (Internet Service) करण्याचे आदेश दिल्याची माहिती पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित (Mahendra Pandit) यांनी दिली आहे.

कोल्हापूर : आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केल्याप्रकरणी कोल्हापुरात हिंदुत्ववादी संघटना (Kolhapur Hindu Association) आक्रमक झाल्या आहेत. बिंदू चौक, अंबाबाई मंदिर परिसर, महाद्वार रोड या परिसरात तरुण मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरले आहेत.

दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित कंपन्यांना इंटरनेट बंद (Internet Service) करण्याचे आदेश दिल्याची माहिती पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित (Mahendra Pandit) यांनी दिली आहे. आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्याने हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या. त्यांनी आज कोल्हापूर बंदची हाक दिली.

दरम्यान, हिंदुत्ववादी संघटनांच्या ठिय्या आंदोलनादरम्यान छत्रपती शिवाजी महाराज चौक, मटण मार्केट, भाऊसिंगजी रोड परिसरात तणाव निर्माण झाला. या परिसरात जमावाने वाहनांची तोडफोड केली. काही ठिकाणी दगडफेकीच्या घटना घडल्या.

या ठिकाणी पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. दरम्यान, सोशल मीडियावरून कोणतीही आक्षेपार्ह माहिती व्हायरल होऊ नये, यासाठी इंटरनेट बंद करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने मोबाईल कंपन्यांना दिले आहेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rupali Chakankar Resigns: ''समाजात आपण कुणालातरी गुरु मानत असतो...'' राजीनाम्यानंतर रुपाली चाकणकरांनी दिलं स्पष्टीकरण

Shivajinagar News : नंबरप्लेटवर चिखल फासून होतेय दिशाभूल; महापालिकेचा फलक लावून शहरात बेकायदा राडारोड्याची वाहतूक

Maharashtra Kesari: महाराष्ट्र केसरी कुस्ती थरारक! मल्लांच्या जिद्द, ताकद आणि कौशल्याने मैदान दणाणलं; जखमी सिकंदर शेखचा आक्रमक खेळ

Pimpri News : ‘मेट्रो मार्गिका-३’ चे काम अंतिम टप्प्यात! हिंजवडी मेट्रोची १२ स्थानके मेपर्यंत सुरू करण्याचे उद्दिष्ट; पीएमआरडीए आयुक्तांकडून पाहणी

पहिल्याच सभेत झेडपी अध्यक्ष-उपाध्यक्षांनी घेतला शिक्षणाधिकाऱ्यांचा तास! शिक्षकांना शिस्त लावा, शाळेत थांबण्याची सक्ती करा, शिक्षणाधिकारी म्हणाले...

SCROLL FOR NEXT