Kolhapur Bandh : आक्रमक जमाव पांगवण्यासाठी पोलिसांनी फोडल्या अश्रूधुराच्या कांड्या; दुकानांची, मालगाड्यांची तोडफोड

सोशल माध्यमातून आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केल्याप्रकरणी कोल्हापुरात हिंदुत्ववादी संघटना (Kolhapur Hindu Association) आक्रमक झाल्या आहेत.
Kolhapur Bandh
Kolhapur Bandhesakal
Summary

जमाव सैरभैर झाल्याने परिस्थिती पोलिसांच्या आवाक्या बाहेर गेली आहे.

Kolhapur Bandh : सोशल माध्यमातून आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केल्याप्रकरणी कोल्हापुरात हिंदुत्ववादी संघटना (Kolhapur Hindu Association) आक्रमक झाल्या आहेत. बिंदू चौक, अंबाबाई मंदिर परिसर, महाद्वार रोड या परिसरात तरुण मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरले आहेत.

Kolhapur Bandh
Kolhapur Bandh : कोल्हापुरात कडकडीत बंद; जमाव पांगवण्यासाठी पोलिसांचा लाठीमार, हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

यावेळी जमावाकडून अनेक दुकानांची, मालगाड्यांची तोडफोड करण्यात आलीये. जमावाला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला तरी परिस्थिती नियंत्रणात येत नाहीये. यामुळं काही ठिकाणी पोलिसांनी अश्रूधुर कांड्या फोडल्या.

Kolhapur Bandh
Kolhapur Bandh : कोल्हापुरात परिस्थिती नियंत्रणाबाहेर; आक्रमक हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी केली तोडफोड

जमाव सैरभैर झाल्याने परिस्थिती पोलिसांच्या आवाक्या बाहेर गेली आहे. पान लाईन, महाद्वार रोडवर, माळकर तिकटी, बारा इमाम परिसर, शिवाजी रोड, अकबर मोहल्ला परिसरात जमावाकडून तोडफोड करण्यात आली आहे. शहरात चौकाचौकात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com