Municipal Commissioner Dr.Mallinath Kalshetti Speaking to reporters after the sudden transfer became emotional 
कोल्हापूर

आयुक्त झाले भावूक : कोल्हापूरसारखे प्रेम कुठेच नाही!

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर :  महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांची तडकाफडकी बदली झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना डॉ. कलशेट्टी भावूक झाले. कोल्हापुरात मी रमलो, कधीही कंटाळलो नाही. विद्यार्थ्यांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनीच माझ्या कामाला दाद दिली. यापुढेदेखील मी नेहमी कार्यरत राहीन; पण कोल्हापूरसारखे प्रेम आपल्याला कुठेही मिळाले नाही, असे सांगत असतानाच कलशेट्टी भावनाविवश झाले आणि त्यांना रडू कोसळले.


कलशेट्टी म्हणाले, ‘‘मला बदलीची माहिती नव्हती. नूतन आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांचा मला फोन आला. त्यानंतर मी त्यांना तातडीने कार्यभार सोपविला आहे. आयुक्त म्हणून मला कोल्हापुरात काम करण्याची संधी मिळाल्यानंतर दर रविवारी स्वछता मोहीम राबविली. सलग ७५ रविवार मोहीम घेण्यात मला यश आले. या मोहिमेला लोकचळवळीचेच स्वरूप आल्याने महापुराच्या काळात या चळवळीचा चांगला उपयोग झाला.’’


ते म्हणाले, ‘‘आयुक्त म्हणून काम करताना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले. विशेषतः पंचंगगा प्रदूषणप्रश्‍नी अनेक महत्त्वाचे निर्णय आणि कामे केली. बारा नाल्यांवर बंधारे घालण्याच्या कामाला सुरवात झाली. कचरा निर्गतीचा मोठा प्रश्‍न होता. सर्वांच्या सहकाऱ्यातून बायोमायनिंगद्वारे कचरा निर्गत करण्यात यश आले. आता हळूहळू कचऱ्याचा डोंगर कमी होत आहे. कोल्हापूरकरांच्या सहकार्यातूनच ही कामे झाली. त्यामुळे कोल्हापूरात मी रमलो, मला कामाचा कधीही कंटाळा आला नाही. 


सर्वसामान्य माणूसदेखील मला कधीही फोन करत होता. त्या प्रत्येक फोनला मी प्रतिसाद दिला. त्यामुळे या कामाची नोंद जनतेने घेतली. बदली झाली आता जे ठिकाण मिळेल तेथेही चांगले काम करण्याचा आपला प्रयत्न राहील.’’

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Child Accident : पुण्यात भीषण अपघात! भरधाव कारने ६ दुचाकी, रिक्षाला उडवले; ४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

Akole Crime: अकोले तालुक्यात खळबळ! पाकिस्तानी ॲप कनेक्शनच्या संशयावरून चौकशी, एक चूक नडली अन् नेमकं काय घडलं..

Aditi Tatkare Mumbai Goa highway : मुंबई -गोवा महामार्गावरील टोल वसुलीला अदिती तटकरेंचा तीव्र विरोध, नितीन गडकरींची घेणार भेट

विकीच्या वाढदिवसादिवशी कतरिनाने शेअर केला विहान फोटो, विकीला म्हणाली, 'तुला शांतपणे ब्लॅक कॉफी पिण्यासाठी...' Post Viral

अश्या प्रकारच्या जल्लोष करण्यावर थेट बंदी घाला! अंबाती रायडू आयपीएलमधील 'त्या' ट्रेंडवर प्रचंड संतापला

SCROLL FOR NEXT