कोल्हापूर

कोल्हापूर : रस्त्याअभावी गर्भवतीचे हाल, झोळीतून नेलं रुग्णालयात

अर्चना बनगे

कोल्हापूर: दुर्गम भागातील नागरिकांना आज किती समस्यांना सामोरे जावे लागते याची प्रचिती आज कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील भुदरगड (Bhudargad) तालुक्यात पहावयास मिळाली. या तालुक्यातील एका गर्भवती महिलेला ज्या रस्त्याने धड चालता सुद्धा येत नाही अशा रस्त्यावरून बांबूची डोली करून तिला रुग्णालयात न्यावे लागले.गेली अनेक वर्ष नागरिक या परिस्थितीचा सामना करत असताना शासन मात्र त्याकडे दुर्लक्ष करीत आहे.

भुदरगड तालुक्यात आजही अनेक गावांमध्ये जाण्यासाठी रस्ते नाहीत. इतर वेळी नागरिक पायवाटेने जातात. मात्र पावसाळ्यामध्ये त्यांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागते.धनगर वाड्यामध्ये एखादा रुग्ण अत्यावस्थ झाला तर त्याला उपचारासाठी दोन किलोमीटर पाय वाटेने घेऊन जावे लागते. आजवासनोली ग्रामपंचायतीच्या जोगेवाडी धनगरवाडा येथील 23 वर्षीय गर्भवती महिलेला उपचारासाठी नेणे अशक्य होते. अत्यावस्थ असलेल्या या महिलेला चालता येत नव्हते. अशा परिस्थितीत नातेवाईक आणि गावकऱ्यांनी बांबूच्या डालीतून घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. भर पावसात चिखलातून पायवाटेने या महिलेला रुग्णालयात नेण्यात आले.

गर्भवती असो किंवा इतर आजारी अशा लोकांना पाळणा करूनच पायवाटेने घेऊन जावे लागते. प्रशासनाचे दुर्लक्ष आणि वन खात्याच्या अडचणीमुळे आज अनेक वाड्यातील लोकांना या अडचणींचा सामना करावा लागत आहे. असे गावकर्‍यांचे मत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local: कामाच्या दिवशी लोकलचा मेगाब्लॉक! दोन दिवस रेल्वेचं वेळापत्रक कोलमडणार; नियोजन करून घराबाहेर पडण्याचं आवाहन

Pune: वादळी वाऱ्याच्या तडाख्यात हिरवं स्वप्न उद्ध्वस्त; पिंपरे परिसरात पत्रे उडाल्याने संसार उघड्यावर

Pune Rave Party Raid : पुण्यात कथित हायप्रोफाईल रेव्ह पार्टीवर मध्यरात्री छापा, रिसॉर्टमधील दृश्य पाहून पोलीसही चक्रावले

Latest Marathi News Live Update : बारामतीत कांद्याला भाव नसल्याने शेतकऱ्यांची हतबलता; ट्रकभर कांदा मेंढ्यांना चारा म्हणून

भूषण प्रधानच्या मनातील ‘स्वप्नसुंदरी’ २४ जुलैला भेटीला येणार! उत्सुकता वाढवणारा टीझर प्रदर्शित

SCROLL FOR NEXT