इस्लामपूरचे मुख्याधिकारी अरविंद माळी यांची पंढरपूरला बदली

इस्लामपूरचे मुख्याधिकारी अरविंद माळी यांची  पंढरपूरला बदली
Updated on: 

इस्लामपूर (सांगली) : इस्लामपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी अरविंद अनिल माळी (Islampur Municipality Chief Arvind Mali)यांची पदोन्नतीने पंढरपूर (जिल्हा सोलापूर) (Pundhrpur, Solapur)या अ वर्ग नगरपालिकेत बदली झाली आहे. काल (ता. १८) नगरविकास विभागाने हे आदेश जारी केले आहेत.

गेले दहा महिने ते इस्लामपूर पालिकेची जबाबदारी सांभाळत होते. इतक्या कमी कालावधीत बदली होणारे ते पहिलेच मुख्याधिकारी असावेत. प्रज्ञा पवार यांच्या पुणे येथे झालेल्या बदलीनंतर ऑगस्ट २०२० मध्ये त्यांनी इस्लामपूर नगरपालिकेचा पदभार स्वीकारला होता. त्याआधी ते पालघर येथे कार्यरत होते. (islampur-municipality-chief-arvind-mali-transferred-in-pandharpur-solapur-munciparty-sangli-news)

इस्लामपुरात आल्यानंतर त्यांना कोविड विषाणू संसर्गामुळे विशेष अशी कामगिरी करता आली नाही, परंतु शासनाकडून आलेल्या निधीचे नियोजन, कोविड मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्वतंत्र स्मशानभूमी असे महत्त्वपूर्ण निर्णय त्यांच्या काळात झाले. याबाबत त्यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, "पदोन्नतीने बदली झाल्याने स्वीकारावी लागेलच. इस्लामपूर शहरासाठी आणखी काम करता आले असते तर आनंदच झाला असता. शहरातील राजकीय पक्ष, नेते, पदाधिकारी, सामाजिक संस्था, संघटना आणि नागरिक यांचे चांगले सहकार्य मिळाले. शिवाय पंढरपूर सारख्या शहरात जाण्याची संधी मिळाली आहे, याचे समाधान आहे."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Farmers in Sangli Await Loan Waiver Benefits as the Fourth List Adds 8,484 More Eligible Beneficiaries.
Sugarcane Transport Protest raju shetti
Sugar mill crisis Maharashtra
Jat Tehsildar Ladki Bahin Yojana memorandum
Marathi News Esakal
www.esakal.com