Ambabai Temple Development Authority esakal
कोल्हापूर

Ambabai Temple : अंबाबाई मंदिराचा सुधारित 1447 कोटींचा आराखडा मंजूर; पालकमंत्री मुश्रीफांच्या अध्यक्षतेखाली समितीची बैठक

अंबाबाई मंदिर परिसर विकासासाठी बनविलेल्या २५५ कोटींच्या आराखड्याअंतर्गत ४५ कोटींच्या निधीला मंजुरी मिळाली आहे.

सकाळ डिजिटल टीम

जिल्हाधिकारी कार्यालयातील राजर्षी शाहू सभागृहात श्री अंबाबाई परिसर पुनर्विकास आराखडा समितीची बैठक पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

कोल्हापूर : श्री अंबाबाई मंदिर विकास प्राधिकरणांतर्गत (Ambabai Temple Development Authority) करण्यात आलेल्या १४४७ कोटींच्या आराखड्याला जिल्हास्तरीय समितीने आज मंजुरी दिली. महापालिकेचा आराखडा व प्राधिकरणअंतर्गत आराखडा या दोन्हींमध्ये समावेश असलेली कामे व त्याची रक्कम एका आराखड्यातून वगळून ही मंजुरी देण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयातील राजर्षी शाहू सभागृहात श्री अंबाबाई परिसर पुनर्विकास आराखडा समितीची बैठक पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीमध्ये श्री अंबाबाई परिसर पुनर्विकास आराखड्याचे सादरीकरण झाले. तो मंजूर करण्यात आला आणि पुढील मंजुरीसाठी शासनाकडे पाठवण्याचे ठरले.

महापालिकेने (Kolhapur Municipal Corporation) अंबाबाई मंदिर परिसर विकासासाठी बनविलेल्या २५५ कोटींच्या आराखड्याअंतर्गत ४५ कोटींच्या निधीला मंजुरी मिळाली आहे. याअंतर्गत दर्शन मंडप, पार्किंगसारखी काही कामे करण्यात येणार आहेत. या दोन्ही आराखड्यांचे प्रस्ताव शासनाला पाठविले आहेत. त्याची छाननी करताना एकच काम दोन्ही आराखड्यात असल्याने एका आराखड्यातून ते काम व त्याची रक्कम वगळण्यात यावी, अशी सूचना शासनाने केली आहे.

ही कामे वगळून सुधारित आराखड्याला जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत मंजूरी देण्यात आली. बैठकीला जिल्हाधिकारी अमोल येडगे, आमदार जयश्री जाधव, जिल्हा नियोजन अधिकारी विजय पवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे एस. आर. पाटील, देवस्थान समितीचे सचिव सुशांत बनसोडे, देवस्थान समितीचे अभियंता सुयश पाटील यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Pune : छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत अमित शाहंचा फोटो; 'भारताचा चाणक्य' म्हणून वादग्रस्त बॅनर?; काँग्रेसने विरोध करताच पोस्टर गायब

अमेरिकेत ट्विटर बॅन करताना दिलेलं कारण मनाला लागलं, म्हणून भारतात आलो; अभिजीत दीपके काय म्हणाला?

Health Minister Prakash Abitkar : अवैध गर्भपात करणाऱ्या कुटुंबांची आता खैर नाही! डिसेंबरमध्ये येणार नवा कडक कायदा; आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांची मोठी माहिती

Latest Marathi News Live Update : कोयना धरणाचे ६ दरवाजे ६ फुटापर्यंत उघडले, विसर्ग वाढला

Pune Dams : पुणे जिल्ह्याची तहान भागली, धरणे ओसंडली; वीर धरणातून विक्रमी विसर्ग, उजनी १०० टक्क्यांच्या उंबरठ्यावर

SCROLL FOR NEXT