कोल्हापूर

पर्यटकांनो सावधान : राजहंस गडावर 144 कलम लागू

अमृत वेताळ

बेळगाव : कोरोना आणि डेल्टा प्लसचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर येळ्ळूर येथील राजहंस गडावर शनिवार व रविवार आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिक व पर्यटकांना निर्बंध लादण्यात आले आहेत. या काळात गड परिसरात १४४ कलम लागू करण्यात आला असून आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा न्यायदंडाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी बजावला आहे.

शेजारील महाराष्ट्र राज्यात कोरोना आणि डेल्टा प्लसचा संसर्ग झपाट्याने वाढत चालला आहे. त्यामुळे सीमावर्ती जिल्ह्यात विशेष खबरदारी घेण्यात आले आहे. महाराष्ट्रातून येणार्‍या प्रवाशांना सीमेवरच रोखून तपासणी केली जात आहे. आरटीपीसीआर अहवाल नसलेल्यांना पुन्हा माघारी धाडण्यात येत आहे. त्यातच बेळगाव तालुक्यातील राजहंस गडावर परराज्यातून पर्यटक येत असल्याने खबरदारी म्हणून राजहंस गडावर शनिवार व रविवार तसेच सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिक व पर्यटकांना निर्बंध लावण्यात आले आहेत. असा आदेश शुक्रवार (ता. २०) जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी जारी केला आहे.

या काळात गड परिसरात १४४ कलम लागू असणार असून आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. त्यामुळे पोलिस खात्याच्यावतीने या आदेशाची अंमलबजावणी केली जाणार आहे. अशी माहिती पोलिस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT