Shahu Chhatrapati Maharaj Kolhapur LokSabha Sanjay Mandlik esakal
कोल्हापूर

शाहू महाराजांनी लढण्याचा निर्णय घेतलाच, तर मलाही..; 2009 ची पुनरावृत्ती होणार सांगत काय म्हणाले मंडलिक?

श्रीमंत शाहू छत्रपती महाराज (Shahu Chhatrapati Maharaj) हे माझ्या वडिलांच्या स्थानी आहेत. मी त्यांचा आदर करतो.

सकाळ डिजिटल टीम

'शरद पवार यांनी माझे वडील कै. सदाशिवराव मंडलिक (Sadashivarao Mandalik) यांच्या वयाचा मुद्दा काढत त्यांना ‘म्हातारा बैल’ असे म्हटले होते.'

कोल्हापूर : श्रीमंत शाहू छत्रपती महाराज (Shahu Chhatrapati Maharaj) हे माझ्या वडिलांच्या स्थानी आहेत. मी त्यांचा आदर करतो. माझ्या माहितीप्रमाणे ते निवडणूक लढवणार नाहीत. पण, त्यांनी निवडणुकीला सामोर जावे यासाठी खासदार शरद पवार हेच प्रयत्न करत असल्याचा दावा खासदार प्रा. संजय मंडलिक (Sanjay Mandlik) यांनी पत्रकारांशी बोलताना केला.

दरम्यान, २००९ ची निवडणूक ही शरद पवार (Sharad Pawar) विरुद्ध कोल्हापूर अशी झाली होती. आता शाहू महाराज यांनी लढण्याचा निर्णय घेतलाच तर मग मलाही पक्ष म्हणून ही निवडणूक लढवावी लागेल आणि मला नक्की संधी मिळेल, असेही मंडलिक म्हणाले.

ते म्हणाले, ‘२००९ च्या निवडणुकीत श्री. पवार यांनी माझे वडील कै. सदाशिवराव मंडलिक (Sadashivarao Mandalik) यांच्या वयाचा मुद्दा काढत त्यांना ‘म्हातारा बैल’ असे म्हटले होते. त्याचवेळी कोल्हापूरच्या स्वाभिमानी जनतेने ही निवडणूक हातात घेतली आणि त्यांच्या उमेदवाराला आस्‍मान दाखवले. आता पुन्हा २०२४ मध्ये माझ्याविरुद्ध श्रीमंत छत्रपती शाहू महाराज लढणार असे वातावरण निार्मण केले जात आहे.

माझ्या वडिलांच्या वयाचा मुद्दा काढणारे श्री. पवार ते नवीन चेहऱ्याला संधी देणार का?’ शिवसेनेच्या १३ खासदारांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे या १३ जागांसह आम्हाला २३ जागा मिळाव्यात, अशी मागणी केली आहे. आम्ही शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर लढणार आहोत. भाजपच्या चिन्हावर लढवले जाणार हे माध्यमांतून पुढे आणले जात आहे. आम्ही भेटत नाही, चिन्ह बदलायला सांगितले गेले या केवळ अफवा आहेत. शिवसेनेचे विद्यमान खासदार आहे त्या ठिकाणी लढतील.’

ते म्हणाले, ‘पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून निधी देण्यात आला नाही. दोन्ही काँग्रेसला जास्त निधी देण्यात येत होता. त्यामुळे आमची उद्धव ठाकरे यांच्याबद्दल नाराजी वाढत गेली. आम्ही मुख्यमंत्री शिंदे ‘बॅकलॉग’ भरून काढणार का, असे विचारून सोबत गेलो. त्यानुसार मोठ्या प्रमाणात निधी शिंदे यांनी दिला आहे. ’

अलीकडे अमित शाह यांची भेट नाही

भाजप नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना अलीकडे कधी भेटलो नाही. पण, पक्षप्रवेश केला त्यावेळी त्यांची भेट घेतली. मुख्यमंत्री शिंदे हे आमच्या पक्षाचे सक्षम नेते आहेत. त्यामुळे सध्या अमित शाह यांना भेटलो नाही, असे सांगत मंडलिक यांनी या संदर्भात आलेल्या बातम्या खोट्या असल्याचे स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs RR Live: इशान किशन बरसला, हेनरिच क्लासनही जबरदस्त खेळला; पण, राजस्थानच्या गोलंदाजांचे पुनरागमन, नितीश रेड्डी भिडला

MPSC पदसंख्या वाढ, मेडिकल कौन्सिल नियमांमध्ये बदल अन्...; मंत्रिमंडळ बैठकीत महायुती सरकारचे ८ महत्त्वाचे निर्णय

MPSC Success Story: पहुरजिऱ्याचा अजय दिघडेचा पराक्रम; MPSC उत्तीर्ण होऊन असिस्टंट कमिशनर पदावर झेप, आई-वडिलांच्या कष्टांना यशाची किनार..

SRH vs RR Live: इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले! पण, जिंकली Orange Cap; झेल घेताना दोन खेळाडू एकमेकांना आपटले

Gadchiroli Health: कोरची तालुक्यात गरोदर मातेसह बाळाचा मृत्यू; आशा वर्करची टाळाटाळी, रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता अन्..

SCROLL FOR NEXT