'सातारा लोकसभा' अजित पवारांकडं? उदयनराजेंनीही व्यक्त केली निवडणूक लढवण्याची इच्छा, संघर्ष होण्याची चिन्हे

बारामती मतदारसंघात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी संपर्क मोहीम सुरू केली आहे.
Loksabha Election Ajit Pawar
Loksabha Election Ajit Pawaresakal
Summary

भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी लोकसभा निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

सातारा : भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) राज्यातील २३ जागांवर निरीक्षकांची नेमणूक केली आहे. यामध्ये बारामती व सातारा मतदारसंघाचा (Baramati and Satara Constituencies) समावेश नाही. त्यामुळे या जागा अजित पवार (Ajit Pawar) गटाला मिळणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

बारामती मतदारसंघात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी संपर्क मोहीम सुरू केली आहे, तर साताऱ्यात महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाकडून उमेदवार दिला जाणार आहे. परिणामी, साताऱ्यात घड्याळ विरुद्ध तुतारी अशी लढत पाहायला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Loksabha Election Ajit Pawar
Loksabha Election : 'तुम्हाला अपेक्षित असलेली ब्रेकिंग न्यूज लवकरच मिळेल'; शाहू छत्रपती महाराजांचे सूचक संकेत

सातारा लोकसभेची निवडणूक महायुतीतील घटक पक्षांच्या दावेबाजीमुळे हॉट बनली होती. शिंदेंची शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी (NCP) आणि भाजपकडून (BJP) या मतदारसंघावर दावा सांगितला आहे. भाजपने तर मागील निवडणुकीपासून येथून खासदार निवडून आणण्याची तयारी केली आहे; पण उमेदवार कोण? हे त्यांनी अद्याप उघड केलेले नाही. जिल्ह्यात भाजपचे अनेक नेते, मंत्री दौऱ्यावर आले; पण त्यांच्याकडून भाजपचा खासदार निवडून द्या, मोदींचे हात बळकट करा, एवढेच सांगण्यात आले.

पण, उमेदवाराचे नाव कोणीही घेतले नव्हते, तर अजित पवारांनी महायुतीत सहभागी झाल्यापासून बारामती व सातारा मतदारसंघावर दावा केला आहे. आता भाजपने लोकसभेसाठी राज्यातील २३ जागांवर निरीक्षकांची नेमणूक केली आहे. यामध्ये मुंबई उत्तर, मुंबई उत्तर-पश्चिम, मुंबई उत्तर मध्य, पुणे, नागपूर, भिवंडी, दिंडोरी, धुळे, नंदुरबार, जळगाव, रावेर, अहमदनगर, बीड, लातूर, जालना, नांदेड, वर्धा, अकोला, भंडारा-गोंदिया, गडचिरोली, सोलापूर, माढा, सांगली या जागांचा समावेश आहे. यामध्ये बारामती, सातारा, नाशिक, रत्नागिरी-सिंधुदुर्ग या जागांसाठी भाजपकडून निरीक्षकाची नेमणूक करण्यात आलेली नाही.

Loksabha Election Ajit Pawar
संयोगीताराजेंची 'ती' पोस्ट अन् राजकीय चर्चेला उधाण; कोल्हापूर लोकसभेच्या उमेदवाराबाबत उत्सुकता वाढली!

त्यामुळे या जागा एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्या गटाला मिळणार, हे निश्चित आहे. बारामती व सातारा लोकसभा मतदारसंघ अजित पवार यांना मिळणार, हे यातून स्पष्ट होत आहे. महाविकास आघाडीतून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाकडून सातारा लोकसभा मतदारसंघात उमेदवार दिला जाईल. सध्याचे खासदार श्रीनिवास पाटील हे त्यांच्याच पक्षात आहेत. त्यामुळे सातारा लोकसभा मतदारसंघात काका-पुतण्याच्या उमेदवारांमध्ये लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

माढा मतदारसंघात भाजपने निरीक्षक दिला आहे. येथून भाजपचे विद्यमान खासदार रणजितसिंह निंबाळकर हे इच्छुक आहेत, तर मोहिते-पाटील यांच्या घरातील धैर्यशील मोहिते-पाटील हेही इच्छुक आहेत. तसेच अजित पवार गटाचे नेते रामराजे नाईक-निंबाळकर यांचे बंधू संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनीही शड्डू ठोकण्याची तयारी केली आहे.

Loksabha Election Ajit Pawar
Konkan Politics : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेसाठी 'महायुती'चा उमेदवार कोण? नारायण राणे की किरण सामंत? उद्या फैसला

त्यामुळे येथून भाजप कोणाला उमेदवारी देणार? यावर सर्व गणिते अवलंबून राहतील. महाविकास आघाडीकडून सध्यातरी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अभयसिंह जगताप हे इच्छुक आहेत, तर रासपचे महादेव जानकर हे महाविकासमध्ये सहभागी झाले, तर तेही उमेदवार असू शकतात. त्यामुळे माढ्यात भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशीच लढत होण्याची शक्यता आहे.

संघर्षाची शक्यता

खासदार उदयनराजे भोसले यांनी लोकसभा निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यातच सातारा लोकसभेवर अजित पवारांनी दावा केलेला असल्याने संघर्ष होण्याची चिन्हे आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com