shivjayanti festival celebrated in kolhapur with various event 
कोल्हापूर

शिवजयंती 2021 : 'जय भवानी जय शिवाजी; जयघोषाने कोल्हापूर झाले शिवमय

संदीप खांडेकर

कोल्हापूर : जय भवानी जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय जिजाऊ जय शिवराय अशा जयघोषात शहर परिसरात शिवजयंती उत्साहाने साजरी झाली. किल्ले पन्हाळगडावरून पहाटेच शिवज्योती शिवभक्तांकडून त्यांच्या गावी रवाना झाल्या. बालचमूंनी परिसरात फेरी काढून शिवजयंतीचा उत्साह टिपेला पोचवला. चौकाचौकात ध्वनिक्षेपकावर लावलेल्या वीरश्रीयुक्त पोवाड्यांनी शिवकाळ उभा केला.

दरम्यान, शिवभक्त राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी नर्सरी बागेत बांधलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या  मंदिरातील शिवरायांच्या मूर्तीचे श्रीमंत शाहू छत्रपती महाराज व जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या हस्ते पूजन झाले. शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला शिवमय वातावरण झाले होते. काल शिवभक्त शिवज्योत आणण्यासाठी पन्हाळगडावर रवाना झाले होते‌. आज पहाटे ते शिवज्योत घेऊन आपापल्या गावी रवाना झाले. शाहीर पिराजीराव सरनाईक यांच्या पोवाड्यांनी सकाळी वातावरणात रंग भरला. बालचमूंनी छोट्या मंडपात शिवमूर्तीची प्रतिष्ठापना करून पूजन केले.  

डोक्यावर भगवी टोपी व भगवा टी-शर्ट परिधान केलेल्या कार्यकर्त्यांनी चौका-चौकात गर्दी केली. नर्सरी बागेतील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मंदिरात श्रीमंत शाहू छत्रपती महाराज व जिल्हाधिकारी देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत शिव जन्मकाळ सोहळा झाला. मूर्तीचे पूजन त्यांच्याच हस्ते झाले यावेळी यशराजे व यशस्विनीराजे छत्रपती, प्रसन्न मोहिते उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज चौकात माजी महापौर निलोफर आजरेकर आयुक्त कादंबरी बलकवडे यांच्या हस्ते शिवजन्म काळ सोहळा झाला. यावेळी श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, जिल्हाधिकारी श्री. देसाई, खासदार प्रा. संजय मंडलिक, कोल्हापूर दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील, आर. के. पोवार, विजय देवणे, आदिल फरास, संभाजी जाधव, जयेश ओसवाल उपस्थित होते.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आश्रमशाळांना युद्धाची झळ, गॅस तुटवड्याचा १८ हजार विद्यार्थ्यांना फटका; भोजन व्यवस्थेसमोर मोठे संकट

नाना पाटेकर ते नसीरुद्दीन शाह, एमएक्स प्लेयरवर २०२६ मध्ये येणार १५० नवीन शो; सगळे पाहता येणार फ्री

‘कुरळे ब्रदर्स’ची धमाल आता घरबसल्या! ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ आता ओटीटीवर, कधी कुठे पाहाल?

नागपूरमध्ये ९० टक्के मोबाईल टॉवर अनधिकृत? खळबळजनक आरोपानंतर राज्य सरकार अ‍ॅक्शन मोडवर, आणणार नवं धोरण!

LPG Crisis: दररोज ७५ लाख बुकिंग; तरीही गॅस तुटवडा नाही, साठेबाजी आणि काळाबाजारावर लगाम; केंद्राने दिले कडक निर्देश

SCROLL FOR NEXT