कोल्हापूर

बचाव आणि सुरक्षितता उपक्रमांतर्गत पन्हाळ्यातील १९६ शाळांना पेनड्राईव्ह - कीटवाटप

CD

02233
बोरपाडळे ः येथे केंद्रावर मुख्याध्यापकांना कीट वाटप झाले. (छायाचित्र ः अनिल एच. मोरे)


पन्हाळ्यातील १९६ शाळांना
पेनड्राईव्हचे कीट वाटप
बोरपाडळे : केंद्र शासनाच्या समग्र शिक्षाअंतर्गत शाळांमधील मुलांसबंधीची बचाव आणि सुरक्षेबाबतची चिंता दूर करण्यासाठी ''बचाव आणि सुरक्षितता व्यापक उपक्रम'' लवकरच जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधून होणार आहे.
त्याअंतर्गत बोरपाडळे (ता. पन्हाळा) येथे सातवे, पैजारवाडी, पन्हाळा, राक्षी आणि कोडोली केंद्रातील मुख्याध्यापकांना पोस्टर्स, किट्स आणि प्रत्येक केंद्रासाठी पेनड्राइव्ह वाटप कार्यक्रम झाला. मुख्याध्यापक संजय नलवडे यांनी स्वागत केले. संपूर्ण शाळा बचाव दृष्टिकोन अभियानामागचा खरा उद्देश आहे. याबाबत समित्या स्थापन होणार असून सामुदायिकरित्या शाळा संरक्षणाचा विषय आहे. कोणतेही गैरवर्तन, हिंसा, मानसिक- सामाजिक समस्या, नैसगिक आपत्ती, आग आणि रहदारी आदी विषयांना या अभियानात स्पर्श होणार असल्याचे जिल्हा गट समन्वयक कृणाल हिरवे यांनी सांगितले. याशिवाय बोरपाडळेसह कळे, कोतोली आदी ठिकाणी अमोल कांबळे, सुला कांबळे, बाबासाहेब खोत यांनी तालुक्यातील १९६ शाळांना साहित्य वाटप केले. केंद्रप्रमुख मल्हारी सावंत यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Car Accident: कल्याणीनगर प्रकरणातील अटकेतील डॉक्टरांच्या अडचणी वाढणार? पोलिसांकडून डॉ. तावरेसह हाळनोरच्या निलंबनाचा प्रस्ताव

Rishabh Pant: 'एअरपोर्टवरही जात नव्हतो, कारण...' टी20 वर्ल्ड कप खेळण्यापूर्वी पंतने सांगितला अपघातानंतरचा अनुभव

Pune Porsche Car Accident: कल्याणीनगर अपघातातील आरोपीला मद्य देणाऱ्या कोझी व ब्लॅकच्या मालकांसह इतरांचे जामिनासाठी अर्ज; उद्या सुनावणी

Fact Check: कंगणा राणौतचा अबू सालेमसोबत फोटो व्हायरल झाल्याचा 'तो' दावा खोटा

Pune Porsche Car Accident: बालसुधारगृहात असलेल्या अल्पवयीन आरोपीचा 'असा' आहे दिनक्रम; पहाटे उठून करावी लागते प्रार्थना अन्...

SCROLL FOR NEXT