कोल्हापूर

जोतिबा डोंगरावर केमिकल युक्त गुलालावर बंदी घातली पण .

CD

02167
जोतिबा डोंगर ः येथे विक्री केला जाणारा गुलाल .

....

केमिकलयुक्त गुलालावर बंदी, पण अंमलबजावणी कधी ?

जोतिबा डोंगरावर प्रशासनाच्या आदेशाला व्यापाऱ्यांकडून केराची टोपली

निवास मोटे, सकाळ वृत्तसेवा

जोतिबा डोंगर, ता. १२ ः महाराष्ट्रासह कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेश राज्यांतील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र जोतिबा डोंगरावर चैत्र यात्रेत गुलालाची उधळण होते. केमिकलयुक्त गुलाल विक्रीला प्रशासनाने गेल्या चैत्र यात्रेपासून बंदी घातली आहे, पण या निर्णयाची अंमलबजावणी हवी तशी होत नाही.
केमिकलयुक्त गुलालामुळे भाविकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होऊ लागल्याने प्रशासनाने हा निर्णय गेल्या चैत्र यात्रेतच घेतला आहे. केमिकलयुक्त गुलाल मुळात कोठून येतो, त्याच्या मुळाशी जाऊन प्रशासनाने शोधमोहीम राबविणे गरजेचे आहे. शिवाय असा गुलाल वापरू नये व विक्री करू नये यासाठी जनजागृती करण्याची गरज आहे.

नैसर्गिक सुगंधी शुद्ध गुलाल विक्रीस ठेवण्याच्या सूचना व्यापाऱ्यांना देण्यात येतात. मात्र, त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. त्यामुळे डोंगरावर येणाऱ्या गुलालाची विशेष पथकाद्वारे तपासणी केली जाणार असल्याचे सांगण्यात येते. ज्या ठिकाणी गुलाल तयार केला जातो, तेथे डोंगरावर पाठविला जाणाऱ्या गुलालाची पाहणी केली जाणार असल्याचे बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांसमोर संबंधित अधिकारी सांगतात, पण त्याकडे दुर्लक्ष होताना दिसते ही वस्तुस्थिती आहे.

‘जोतिबाच्या नावानं चांगभलं’ म्हणत देवाची पालखी व शिखरावर गुलाल-खोबरे उधळण्याची परंपरा आहे. हाच गुलाल महाराष्ट्रासह अन्य राज्यांतील कानाकोपऱ्यात जोतिबा देवाच्या चैत्र यात्रेची महती घेऊन जातो. डोंगरावर येणारा गुलाल हा इस्लामपूर, कुंडल (जि. सांगली), टाकळी (पंढरपूर) व वाई या ठिकाणी तयार केला जातो. जोतिबा डोंगरावर येणारा गुलाल सर्रास केमिकलयुक्त असून, तो आरोग्याच्यादृष्टीने घातक आहे. पूर्वीचा गुलाल नैसर्गिक व सुगंधी होता. तो फुले व साबूपासून तयार केला जात असे. त्यापासून इजा होत नव्हती. त्यामुळे आता डोंगरावर नैसर्गिक गुलालाशिवाय पर्याय नाही. गेल्या चैत्र यात्रेपासून प्रशासनाने शुद्ध गुलालाची सक्ती केल्याने भाविकांतून समाधान व्यक्त होत आहे, पण यासाठी ठोस पावले उचलणे गरजेचे आहे .
.......... ..

‘जोतिबा डोंगरावर चैत्र यात्रेत मोठ्या प्रमाणात गुलाल उधळला जातो. केमिकलयुक्त गुलालामुळे त्वचेवर परिणाम होतात. येथे भेसळयुक्त गुलाल मोठ्या प्रमाणात येतो. गेल्या यात्रेपासून या गुलालावर प्रशासनाने बंदी घातली आहे. चैत्र यात्रेत शुद्ध गुलालच वापरला जावा यासाठी प्रशासन ठाम आहे. यंदा यात्रेपूर्वी गुलालाची तपासणी केली जाणार आहे. यासाठी पथके नेमली जाणार आहेत.

रमेश शेंडगे, तहसीलदार, पन्हाळा
................

खोबरे वाटी उधळण्यास बंदी कायम

२०१९ पासून जिल्हा प्रशासनाने मंदिराच्या कळसावर खोबऱ्याच्या वाट्या फेकण्यास बंदी घातली आहे. यंदासुद्धा ही बंदी कायम असून खोबरे वाटीचे तुकडे करूनच ते उधळावे. व्यापारी, दुकानदारांनी खोबऱ्याचे तुकडे करूनच विक्री करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. .
.............

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

J&K Bus Accident : जम्मू-काश्मीरमध्ये खोल दरीत बस कोसळली; 4 जवान ठार, ३१ जखमी

Mukesh Ambani यांनी खरेदी केलं १००० हून अधिक कोटीचं विमान; देशात असं Jet कोणाकडेच नाही; काय आहे खास?

Mumbai News: भर रस्त्यात महिलेला प्रसूतीकळा; ताडपत्री अन् बॅनरच्या मदतीने पोलिसांनी साधलं प्रसंगावधान

Yashasvi Jaiswal ने सुनील गावसकरांचा विक्रम मोडला, सर डॉन ब्रॅडमन यांच्या पंगतीत जाऊन बसला

Mumbai Senate Election: मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थागित; सुप्रिया सुळेंची सडकून टीका

SCROLL FOR NEXT