Kolhapur News sakal
कोल्हापूर

Vishalgad Violence: ...तर माजी खासदाराला पायताणाने हाणू! सकल हिंदू समाजानं दिला १९ जुलैला कोल्हापूर बंदचा इशारा

Whole Hindu Society Warns: विशाळगड हिंसाचार प्रकरणावरुन कोल्हापुरातील वातावरण पुन्हा एकदा तापण्याची चिन्हं आहेत.

Amit Ujagare (अमित उजागरे)

कोल्हापूर : विशाळगड हिंसाचार प्रकरणावरुन कोल्हापुरातील वातावरण पुन्हा एकदा तापण्याची चिन्हं आहेत. कारण या हिंसाचाराविरोधात एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी कोल्हापुरात मोर्चा काढणार असल्याची घोषणा केली आहे. पण याला सकल हिंदू समाजानं विरोध दर्शवला असून १९ जुलै रोजी कोल्हापूर बंदची हाक देण्याचा इशारा दिला आहे.

विशाळगड हिंसाचारप्रकरणी इम्तियाज जलील यांनी कोल्हापुरात मोर्चा काढणार असल्याची घोषणा केली आहे. मात्र, या मोर्चाला सकल हिंदू समाजानं कडाडून विरोध दर्शवला आहे. इम्तियाज जलील जर कोल्हापुरात आले तर त्यांचं कोल्हापुरी पायतानानं स्वागत करू तसंच या घटनेविरोधात एमआयएमनं कोल्हापुरात मोर्चा काढल्यास 19 जुलैला सकल हिंदू समाजाच्यावतीनं कोल्हापूर बंदची हाक देण्यात येईल, असा इशारा हिंदू एकता संघटनेचे जिल्हाध्यक्ष दीपक देसाई यांनी दिला आहे.

...तर मोर्चाने उत्तर देणार - मनसे

एमआयएमकडून जलील यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूरात शुक्रवारी (ता. १९) निषेध मोर्चा निघणार आहे. याला विरोध करताना जलील आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर जिल्हा पोलिस प्रशासनं तत्काळ कोल्हापूर जिल्हा बंदीचा आदेश लागू करावा.

यानंतरही जर जलील कोल्हापूरमध्ये मोर्चा काढणार असतील तर त्यांच्या मोर्चाला मनसे, सकल हिंदू समाजाकडून मोर्चाद्वारे उत्तर दिलं जाईल, असा इशारा मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष रोहन निर्मळ पत्रकार परिषदेत दिला. निर्मळ म्हणाले, "कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज यांनी विशाळगडावर पाहणी केल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना शिवभक्तांचा अतिरेकी असा उल्लेख केला. या घटनेचा आम्ही तीव्र शब्दात जाहीर निषेध करत आहोत. शाहू महाराजांनी तमाम शिवभक्तांची माफी मागावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! ७ महिने झाले अनाथांना मिळाले नाहीत बालसंगोपन योजनेचे पैसे; राज्यातील सव्वालाख चिमुकल्यांचे हाल; दरमहा अपेक्षित आहेत २२५० रुपये

आजचे राशिभविष्य - 4 जुलै 2025

Latest Maharashtra News Updates : कोल्हापुरात पंचगंगेच्या पातळीत एक फुटाने वाढ, ५० बंधारे पाण्याखाली

अग्रलेख : मूक आक्रंदनाचा वारसा

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 4 जुलै 2025

SCROLL FOR NEXT