women of fugger cutting dies in accident of tractor in kolhapur 
कोल्हापूर

कोल्हापूर : ट्रॅक्टरच्या अपघातात ऊस तोडणी महिला मजूर ठार, दहाजण जखमी

प्रकाश कोकितकर

सेनापती कापशी (कोल्हापूर) : आज सकाळी कागल तालुक्यातील काळम्मा बेलेवाडी आणि वडगाव दरम्यान झालेल्या ट्रॅक्टर अपघातात ऊस तोडणी महिला मजूर ठार झाली. यामध्ये दहा जण जखमी झाले असून एक तरुण गंभीर आहे. यातील रुक्मिणी खांडेकर या महिला मजुराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर मच्छिंद्र गुळवे यांची प्रकृती गंभीर आहे. इतर जखमी मजुरांना गडहिंग्लज येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. 

दरम्यान, चालक पळून गेल्याने नाव समजू शकले नाही. कागल येथील छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याच्या ऊस तोडणी मजुरांची टोळी काळम्मा बेलेवाडी येथून कसबा सांगावकडे उर्वरित ऊस तोडण्यासाठी रामगोंड आरगोंड पाटील (रा. कोगनोळी) यांच्या मालकीच्या ट्रॅक्टर मध्ये बसून आपल्या दैनंदिन साहित्यासह जात होते. यामध्ये आठ कुटुंबातील 21 ऊस तोडणी मजूर व त्यांची मुले होती. वडगाव हद्दीत खडक ओढ्याजवळ चालकाचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटले आणि ट्रॅक्टर ट्रॉलीसह रस्ता पार करून शेतात जाऊन पलटी झाला. यात मजूर अडकले.

यामध्ये महिला मजूर रुक्मिणी दिगंबर खांडेकर (वय 25 रा. ईळगाव ता. गंगाखेड, जि. परभणी) आणि मच्छिंद्रनाथ गुळवे गंभीर जखमी झाले. याशिवाय दहा जणांना हात, पाय, कंबर अशा ठिकाणी गंभीर दुखापत झाली. याची माहिती मिळताच शाहू कारखान्याच्या प्रशासनाच्यावतीने अधिकारी व कर्मचारी तसेच दोन गावचे लोक मदतीसाठी धावून गेले. तरुणांनी जेसीबीच्या मदतीने ट्रॅक्टर उचलण्याचे काम केले. कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना त्वरित गडहिंग्लज येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. पुढील उपाचारासाठी मच्छिंद्र गुळवे यांना कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात दाखल केले आले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT