Panhala Police Crime News esakal
कोल्हापूर

Kolhapur Crime : बायको माहेरी गेल्याच्या निराशेतून नवऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या; गणपती विसर्जन मिरवणूक संपवून घरी आला अन्..

या घटनेची नोंद पन्हाळा पोलिसांत (Panhala Police) झाली आहे.

सकाळ डिजिटल टीम

मिरवणूक संपल्यानंतर तो घरी जाऊन झोपला. पहाटेच्या सुमारास त्याने आत्महत्या केली.

पन्हाळा : पत्नी (Wife) माहेरी गेल्याच्या निराशेतून यवलूज (ता. पन्हाळा) येथे सोमवारी पहाटे संतोष सखाराम जाधव (वय ३२) या तरुणाने घराच्या भिंतीलगत असलेल्या छताच्या लोखंडी अँगलला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

या घटनेची नोंद पन्हाळा पोलिसांत (Panhala Police) झाली आहे. याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, संतोष जाधव याची पत्नी अनेक दिवसांपासून माहेरी राहत होती. त्यामुळे संतोषला नैराश्य आले होते. त्यातच त्याला दारूचे व्यसन लागले होते. चार वर्षांपूर्वी त्याच्या वडिलांचे निधन झाले आहे. सध्या तो आईसोबत राहत होता.

मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होता. रविवारी संतोष गल्लीतील मंडळाच्या कार्यकर्त्यांसमवेत गणपती विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाला होता. मिरवणूक संपल्यानंतर तो घरी जाऊन झोपला. पहाटेच्या सुमारास त्याने आत्महत्या केली. त्याच्या मागे आई, पत्नी आणि दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT