माधुरी निडगुंदी यांचा राजीनामा sakal
पश्चिम महाराष्ट्र

कुडची : नगर परिषदेच्या नगराध्यक्षा माधुरी निडगुंदी यांचा राजीनामा

शहराच्या विकासासाठी मतभेद विसरून राजकीय मंडळींनी कामे करण्याची मागणी

सकाळ वृत्तसेवा

चिक्कोडी: प्रांताधिकारी संतोष कामगौडा यांच्याकडे राजीनामा देताना नगराध्यक्षा माधुरी निडगुंदी. शेजारी अन्य.कुडची नगर परिषदेच्या नगराध्यक्षा माधुरी निडगुंदी यांचा राजीनामारायबाग, ता. १२ कुडची नगर परिषदेच्या नगराध्यक्षा माधुरी निडगुंदी यांनी शुक्रवारी (ता. ११) आपल्या पदाचा राजीनामा चिक्कोडीचे प्रांताधिकारी संताष कामगौडा यांच्याकडे दिला.

कुडची नगर परिषदेच एकुण २३ सदस्य आहेत. त्यात काॅंग्रेस १४ तर भाजप ९ असे बलाबल आहे. पालिकेवर काॅंग्रेसचे वर्चस्व असले तरी नगराध्यक्ष पदासाठी एस. सी. असे आरक्षण भाजपने आणले होते. दोन सदस्यांना नगराध्यक्ष पदासाठी प्रत्येकी १५ महिन्याचा कालावधी देण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार पहिल्यांदा माधुरी निडगुंदी यांची निवड झाली. दुसऱया टर्मसाठी दत्ता सन्नक्की यांना संधी मिळणार होती. पण ठरल्यानुसार निडगुंदी यांनी राजीनामा देण्यास टाळटाळ केली. तसेच काॅंग्रेसच्या मदतीने अविश्वास ठराव आणण्याच्या हालचालींना वेग आला होता. त्याची दखल घेत भाजपच्या काही नेत्यांनी मध्यस्थी करून राजीनामा देण्यासाठी निडगुंदी यांचे मनःपरिवर्तन केल्याची चर्चा आहे.

नगराध्यक्षांच्या या दिरंगाईबाबत आमदार पी. राजीव यांनीही नाराजी व्यक्त केल्याचे समजते. निडगुंदी यांनी राजीनामा दिल्याने आता दत्ता सन्नक्की यांची नगराध्यक्षपदी निवड निश्चित मानली जात आहे. सन्नक्की हे आमदार पी. राजीव यांचे विश्वासू आहेत. ते तरूण असून शासकीय व कार्यालयीन कामाची माहिती आहे. परिणामी कुडचीसाठी जास्तीत जास्त विकासनिधी मिळून संपूर्ण विकासाला मदत होणार असल्याची चर्चाही आहे. शहराच्या विकासासाठी मतभेद विसरून राजकीय मंडळींनी कामे करण्याची मागणी सर्वसामान्यांतून होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindu Temple Entry Law : जन्माने हिंदू नसाल तर मंदिरात प्रवेश मिळणार नाही? हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

Solapur News: सोलापूरकरांना महागाईचा आणखी एक झटका! १ जुलैपासून कटिंग १३०, दाढी ७० रुपये; नाभिक संघटनेची १०% दरवाढ

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Paud Agriculture Day: पौड येथे कृषी दिन उत्साहात साजरा; वसंतराव नाईक जयंतीनिमित्त शेतकरी सन्मान व योजनांवर मार्गदर्शन

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

SCROLL FOR NEXT