Accident Sakal media
पश्चिम महाराष्ट्र

मांगुर-कुन्नूर रस्त्यावर दुधगंगा नदीच्या पुलाजवळ अपघात; दुचाकीस्वार जागीच ठार!

सकाळ वृत्तसेवा

मांगुर : मांगुर-कुन्नूर रस्त्यावरील दुधगंगा नदीच्या (Dudhganga river) पुलाजवळ झालेल्या अपघातात कुन्नूर येथील दुचाकीस्वार (One person death) अण्णासो गणपती चौगुले (वय 44) हे जागीच ठार झाले. मंगळवारी (ता. 15) रात्री हा अपघात घडला. सदलगा पोलिस ठाण्यामध्ये (sadlaga Police station) या घटनेची नोंद झाली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी, कुन्नूर येथील अण्णासो चौगुले हे मंगळवारी (ता. 15) रात्री अकराच्या दरम्यान मांगूरहून कुन्नूरकडे जात होते. मांगुर येथील दूधगंगा नदीच्या पुलाजवळ आल्यानंतर दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या कठड्याला धडकली. या अपघातात चौगुले हे जागीच ठार झाले. तसेच त्यांच्यासोबत असलेले आणखी एक जण किरकोळ जखमी झाले.

घटनेचा पंचनामा झाल्यानंतर मृत चौगुले यांचा मृतदेह सदलगा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये शवविच्छेदनासाठी नेण्यात आला. त्यानंतर बुधवारी दुपारनंतर मृतदेह कुटुंबीयांचकडे सुपूर्द करण्यात आला. कुन्नूर येथे मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. चौगुले यांच्या आकस्मिक अपघाती निधनाने कुन्नूरवर शोककळा पसरली होती. मृत चौगुले यांच्या मागे आई, पत्नी, मुलगा, दोन मुली असा परिवार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC ODI World Cup Schedule : प्रतीक्षा संपली! वन डे वर्ल्ड कप २०२७ स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर; India vs Pakistan सामना कधी व केव्हा; जाणून घ्या टीम इंडियाचे टाईमटेबल

ICC ODI World Cup 2027 India Fixture: India vs Pakistan एकदा नव्हे, तर तीनवेळा भिडणार, जाणून घ्या कधी व कुठे खेळणार...

Crop Panchnama Maharashtra : दुष्काळी तालुक्यांत सुट्टीच्या दिवशीही पीक पंचनामे करा; ग्रामसेवक, तलाठ्यांना जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, तीन दिवसाच्या सुट्ट्या रद्द

Dhananjay Munde : दुष्काळ प्रश्नी धनंजय मुंडे मुख्यमंत्र्यांना भेटले; पीएम किसान व नमो शेतकरी सन्मान चे दोन दोन हप्ते तातडीची मदत म्हणून वितरीत करण्याची मागणी

IND vs WI: प्रसिद्ध कृष्णानंतर वॉशिंग्टन सुंदरलाही मालिकेतून केलं OUT! चाहत्यांना धक्का, पण दुखापत नसताना का घेतला हा निर्णय?

SCROLL FOR NEXT