पश्चिम महाराष्ट्र

Ladki Bahin Yojna: बारामतीत देवाभाऊंच्या फ्लेक्सवरुन अजित पवार गायब... लाडक्या बहिणीवरून महायुतीत चढाओढ

Ajit Pawar News: बारामतीत हा फ्लेक्स लावताना पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांचा फोटो आहे, मात्र दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोटो फ्लेक्सवर वापरलेला नाही.

मिलिंद संगई, बारामती

बारामती: मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या श्रेयवादावरुन महायुतीतच चढाओढ सुरु असतानाच बारामतीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा एक फ्लेक्स मोरगाव रस्त्यावरील एका होर्डिंगवर झळकला.

बारामतीत हा फ्लेक्स लावताना पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांचा फोटो आहे, मात्र दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोटो फ्लेक्सवर वापरलेला नाही.

हा फ्लेक्स नेमका कोणी लावला याची स्पष्टता नसली तरी या योजनेमध्ये देवेंद्र फडणवीस यांचीही भूमिका महत्वाची आहे असाच संदेश यातून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. एकीकडे जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने अजित पवार राज्यभरात मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा प्रसार व प्रचार करत आहेत.

ही योजना लोकप्रिय ठरत असल्याचे चित्र असतानाच बारामतीत अजित पवारांना वगळून देवेंद्र फडणवीस यांचा देवाभाऊ असा उल्लेख केलेला व नरेंद्र मोदी व एकनाथ शिंदेचा असलेला फोटो व अजित पवारांचा वगळलेला फोटो याची बारामतीत चर्चा होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price Today: कच्च्या तेलाचे भाव वाढले! CNG दरवाढीनंतर आता पेट्रोल-डिझेलही महाग? पाहा महाराष्ट्रातील आजचे दर

‘ती’ पुन्हा येतेय! नजरेत तलवार, चाल अंगार, झी मराठीच्या नव्या मालिकेच्या प्रोमोतील ‘ती’ अभिनेत्री नेमकी कोण?

Pune Satara Highway: खंबाटकी घाटाच्या पायथ्याशी ट्रक पलटी; दोन किलोमीटर वाहनांच्या रांगा, वाहतूक विस्कळीत

Marathi News Live Updates : BMCची उधळपट्टी, ४ मिनिटांच्या माहितीपटासाठी ६ लाखांचा खर्च

Pakistan Match Fixing : पाकिस्तानी फिक्सर, इंग्लंड दौऱ्यावर संशयास्पद घडामोडी! फोन जप्त, PCB कडून चौकशी; खूप मोठी नावं अडकणार?

SCROLL FOR NEXT