Manoj Jarange-Patil esakal
पश्चिम महाराष्ट्र

Maratha Reservation: कळपं एकत्र आलेत, जात वाचवणं आवश्यक आहे; मनोज जरांगेंचे आवाहन

मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची आज सांगलीमध्ये सभा झाली

कार्तिक पुजारी

सांगली- मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची आज सांगलीमध्ये सभा झाली. यावेळी मराठा समूदायाला संबोधित करताना ते म्हणाले की, 'आता आराम करुन चालणार नाही. नाहीतर आपल्या लेकरांचं वाटोळं होईल. आपल्या लेकरांना भविष्यात त्रास होईल असं आपल्याला काही करायचं नाही.' जरांगेंच्या सभेवेळे प्रचंड घोषणाबाजी झाल्याचं पाहायला मिळालं.

मराठा समाज कधी शहाणा होणार. सर्वांची पोरं ऊस तोडायला गेल्यावर शहाणा होणार का? आता गाफील राहून चालणार नाही. सगळ्यांनी चारी बाजूंनी मराठ्याला घेरलं आहे. हे षडयंत्र मोडून काढण्यासाठी आपल्याला एकत्र यावं लागले. गेल्या ७० वर्षांपासून असलेला वेढा आपल्याला फोडावा लागेल. ज्या मराठा बांधवांना आरक्षण आहे, त्यांनीही एकत्र घेण्याची येण्याची गरज आहे, असं जरांगे म्हणाले.

बिगर कामाचे कळपं एकत्र यायला लागले आहेत. पण, एकटा मराठा समाज राज्यात ५० टक्क्यांच्या वरती आहे. त्यामुळे कितीही कळपं एकत्र आले तरी टेंशन घेण्याची गरज नाही. आज जात वाचवणं आवश्यक आहे. त्यामुळे आरक्षण असलेल्या आणि नसलेल्या बांधवांनी एकत्र यावं. आपल्याला आव्हाव पेलायचं आहे. आपल्या मुलांना मोठं करण्यासाठी सज्ज रहा, असंही ते म्हणाले.

आपली जात उद्धवस्त होता कामा नये, आपली जात आणि आपली पोरं उद्धवस्त होता कामा नये. पोरं संपली तर जात संपली. आतापर्यंत जे आयोग झाले त्यांनी सांगितलं की पुरावे नाहीत, म्हणून आरक्षण नाही. पण, आता पुरावे सापडायला लागले आहेत. लाखोंच्या संख्येने पुरावे सापडत आहेत, असंही ते म्हणाले.

आपल्याला ओबीसीमध्ये सामाविष्ठ व्हायचं आहे. मराठा समाजाने ओबीसीमध्ये येण्यासाठी सर्व निकष पूर्ण केले आहेत. व्यवसायावरुन जाती निर्माण झाल्या. मराठ्यांचा व्यवसाय शेती आहे. क्षत्रिय असल्याने मराठ्यांना लढायची देखील माहिती आहे. आणि व्यवसाय शेती असल्याने देशाला अन्य धान्य पुरवण्याची आपली जात आहे, असं जरांगे पाटील म्हणाले.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local Train : मुंबईकरांसाठी खुशखबर! मध्य रेल्वेवर १५ डब्यांच्या लोकलच्या आणखी १० फेऱ्या, १२ डब्यांच्या लोकलचे १५ डब्यांत रूपांतर

FDA Crime : पुणे शहरातील प्रसिद्ध गोल्‍डन बेकरीसह दहा बेकरी, रेस्टॉरंटचे परवाने निलंबित; अस्वच्छतेप्रकरणी एफडीएची कारवाई

Garfield Sobers: क्रिकेटच्या इतिहासातील महान ऑलराउंडर काळाच्या पडद्याआड! गॅरी सोबर्स यांचं निधन; क्रीडाजगत शोकसागरात

Pune News : जप्त गुळाचे करायचे काय? गूळ उत्पादकांचा सवाल, जवळपास ४०० गुऱ्हाळांवर परिणाम

Amritsar Express: अमृतसर एक्स्प्रेसच्या डब्याखाली सापडला मानवी पाय; सीएसएमटी रेल्वे यार्डमधील घटना, रेल्वे पोलिसांना वेगळाच संशय

SCROLL FOR NEXT