Maratha Reservation : आई कमलाई, मराठ्यांवरचा अन्याय दूर करण्यासाठी सरकारला सद्‌बुद्धी दे; मनोज जरांगेंचे देवीला साकडे

२४ डिसेंबरपर्यंत निश्चितपणे मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सुटेल.
Manoj Jarange-Patil Mata Kamlai Devi Darshan
Manoj Jarange-Patil Mata Kamlai Devi Darshanesakal
Summary

वांगी (ता. करमाळा) येथील सभा संपून रात्री मनोज जरांगे-पाटील यांनी वांगी येथे मुक्काम केला.

करमाळा : माता कमलाई देवीच्या (Mata Kamalai Devi) चरणी प्रार्थना केली आहे, ‘आई आमच्या लेकरांना जो त्रास होतोय, आमच्यावर जो अन्याय होतोय, तो दूर करण्यासाठी सरकारला सद्बुद्धी द्यावी आणि मराठा समाजाला बळ द्यावं’ कमलाभवानी आईने आशीर्वाद दिला आहे.

Manoj Jarange-Patil Mata Kamlai Devi Darshan
Raju Shetti : फक्त आठ दिवस थांबा, सगळे साखर कारखानदार गुडघे टेकतील; राजू शेट्टींचा स्पष्ट इशारा

२४ डिसेंबरपर्यंत निश्चितपणे मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सुटेल, अशी भावना मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange-Patil) यांनी करमाळा व्यक्त केली. मनोज जरांगे-पाटील यांनी करमाळा येथील श्री कमलाभवानी देवीचे दर्शन घेऊन देवीची आरती केली. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

Manoj Jarange-Patil Mata Kamlai Devi Darshan
Loksabha Election : भाजप निंबाळकरांचं तिकीट कापणार? मोहिते-पाटलांच्या 'या' घोषणेमुळं राजकीय चर्चांना उधाण

वांगी (ता. करमाळा) येथील सभा संपून रात्री मनोज जरांगे-पाटील यांनी वांगी येथे मुक्काम केला. गुरुवारी सकाळी त्यांनी करमाळा येथे श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर मनोज जरांगे-पाटील यांनी कमलाभवानी मंदिरात आरती केली. नंतर त्यांनी स्वातंत्र्यसैनिक मनोहरपंत चिवटे मल्टीस्टेट हॉस्पिटलच्या डायलिसिस सेंटरला भेट दिली. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी त्यांचे स्वागत केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com