Sangram-Jagtap
Sangram-Jagtap 
पश्चिम महाराष्ट्र

आमदार जगताप यांच्या कोठडीत वाढ

सकाळवृत्तसेवा

नगर - केडगाव दुहेरी हत्याकांडप्रकरणी अटकेत असलेले आमदार संग्राम जगताप यांच्यासह तिघांच्या पोलिस कोठडीत दोन दिवस वाढ झाली; तर अन्य दोन आरोपींना न्यायालयाने तीन दिवस (ता. 19 पर्यंत) पोलिस कोठडी दिली.

केडगाव येथे दहा दिवसांपूर्वी शिवसेनेचे शहर उपप्रमुख संजय कोतकर आणि वसंत ठुबे यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. याप्रकरणी मुख्य आरोपी संदीप गुंजाळ, बाळासाहेब कोतकर, बी. एम. ऊर्फ भानुदास कोतकर, आमदार संग्राम जगताप, बाबासाहेब केदार यांची पोलिस कोठडीची मुदत संपल्याने आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. तपासी अधिकारी पोलिस निरीक्षक दिलीप पवार म्हणाले, 'मुख्य आरोपी संदीप गुंजाळ याच्या कबुलीवरून दोन आरोपींची नावे निष्पन्न झाली होती. त्यावरून आरोपी संदीप गिऱ्हे, महावीर मोकळे यांना अटक केली असून, 19 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

हत्याकांडाचा मुख्य आरोपी विशाल कोतकर फरार असून, त्याला अटक करावयाची आहे. त्याला अटक केल्यानंतर आरोपींनी गुन्ह्याचा कट कोठे रचला, त्यात आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा शोध घ्यावयाचा आहे.''

आरोपींतर्फे बाजू मांडताना ऍड. महेश तवले म्हणाले, ""फिर्याद खोटी असून, चुकीच्या पद्धतीने दिलेली आहे. आमदार संग्राम जगताप यांना आतापर्यंत नऊ दिवस पोलिस कोठडी देण्यात आली आहे. तपासात अद्यापपर्यंत त्यांचा गुन्ह्यात सहभाग आढळून आलेला नाही.''

विशाल कोतकरचा शोध सुरू
केडगाव दुहेरी हत्याकांडाचा तपास सध्या मुख्य सूत्रधार विशाल कोतकर याच्याभोवती फिरत आहे. पोलिस त्याच्या मागावर आहेत. विशाल कोतकर आणि मुख्य आरोपी संदीप गुंजाळ यांच्या संवादाचे पुरावे पोलिसांना मिळाले आहेत. त्यापूर्वी विशाल कोतकर याच्याबरोबर कोणी संवाद साधला, याचा शोध पोलिस घेत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Boiler blast in Sonipat: डोंबिवलीतील घटना ताजी असताना आणखी एका कारखान्यात बॉयलरचा स्फोट; ४० कामगार होरपळले, 8 जण गंभीर

Gautam Gambhir : गंभीरने सहा महिन्यांपूर्वी केलेल्या 'त्या' मेसेजबद्दल KKR च्या नितीश राणाचा खुलासा; काय लिहिलेलं त्यात?

Latest Marathi Live News Update : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भिमाशंकरला भाविकांसह पर्यटकांची तुफान गर्दी

Nashik Crime News : माजी महापौर अब्दुल मलिक गोळीबार प्रकरणी दोघांना अटक; हल्ला व्यावसायिक वादातून

Porsche Accident : 'ससून'च्या चौकशी समितीला बिर्याणीची मेजवाणी; पुण्यातल्या 'या' प्रसिद्ध हॉटेलातून आलं पार्सल

SCROLL FOR NEXT