पश्चिम महाराष्ट्र

मोबाईल पिस्तुल प्रकरणः कळंबा कारागृहातील दहा कर्मचारी संशयाच्या भोवऱ्यात

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर - कळंबा कारागृहातील मोबाईल व पिस्तुल प्रकरणात कारागृहातील दहा कर्मचाऱ्यावर संशय व्यक्त करण्यात आला आहे, अशी माहिती कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. 

साठे यांनी सांगितले की या संशयित दहा कर्मचाऱ्यांची कसून चौकशी सुरू आहे. या प्रकरणात कारागृहातील कर्मचारी दोषी आढळल्यास कठोरातील कठोर कारवाई करण्यात येईल. पोळ यांच्याकडे सापडलेली पिस्तुल हे बनावट आहे. बंदीरजनी कार्यक्रमातील पिस्तुल सदृश वस्तू पोळने दाखवली असल्याचीही माहिती साठे यांनी दिली.

अवैद्य वस्तू कारागृहात आणणे व कारागृह प्रशासनाला वेठीस धरल्या प्रकरणी डॉ. पोळसह अमोल पवारवर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. 
- शरद शेळके, 
कारागृह अधीक्षक  

माेबाईल कारागृहात येण्याचे अनेक मार्ग आहेत. प्रत्येक शक्यतेच्या सखोल तपास करण्यात येणार आहे. मोबाईल फोन प्रकरणात संतोष पोळ याला अमोल पवार या कैद्याची साथ लाभली असल्याचा संशय आहे. पण मोबाईल पुरवणाऱ्यावर कडक कारवाई केली जाणार आहे. यात कोणाचीही गय केली जाणार नाही, असेही कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांनी सांगितले.

मोबाईल व रिव्हॉल्व्हर माझ्या जवळच आहे ते मी न्यायालयात देणार असे डाॅ. पोळ याने साठे यांच्या समोर सांगितले. यावर साठे यांनी तो न्यायालयात काय देतो ते पाहू असे सांगितले. 

संबंधीत बातम्या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS Officers Transfer : पोलिस विभागात मोठा फेरबदल; ८ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, 'या' सरकारचा तडकाफडकी निर्णय

'ऑपरेशन सिंदूर'चे नायक ते आता राम मंदिराचे नवे CEO, कोण आहेत निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा?

SBIच्या ग्राहकांनो लक्ष द्या! 'या' दिवशी UPI सेवा राहणार बंद; आर्थिक व्यवहार करण्यासाठी दिला पर्याय

Pune Mobile Recovery : ओतूर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; तांत्रिक तपासातून २५ गहाळ मोबाईल शोधून सहा लाख ५० हजारांचा मुद्देमाल मालकांना परत

Ringroad Land Acquisition : रिंगरोडसाठी आठ गावातील भूसंपादनाचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे

SCROLL FOR NEXT