accident in malakapur sakal
पश्चिम महाराष्ट्र

Accident News: कऱ्हाडजवळ अपघातात पिंपळगावचा एक ठार

Traffic on the Karhad-Kolhapur route was disrupted for some time after the accident: थांबलेल्या ट्रकवर मोटार आदळली; एकजण जागीच ठार तर एक जखमी.

सकाळ वृत्तसेवा

Malakapur: मलकापूर येथे महामार्गाकडेला उभ्या असणाऱ्या ट्रकला धडकल्यानंतर भरधाव मोटार ट्रकखाली घुसली. यामध्ये मोटारीतील एकजण जागीच ठार, तर एकजण जखमी झाला. बुधवारी मध्यरात्री बाराच्या सुमारास येथील झाडाखालच्या वडापाव दुकानासमोर हा अपघात झाला. अपघातानंतर कऱ्हाड-कोल्हापूर मार्गिकेवरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. विष्णू दत्तू सुतार (वय ५५, रा. पिंपळगाव बुद्रुक, ता. कागल, जि. कोल्हापूर) असे ठार झालेल्याचे नाव आहे, तर चालक अभिजित शिवाजी मुळे (रा. पिंपळगाव खुर्द, ता. कागल, जि. कोल्हापूर) जखमी झाला.

मालवाहू ट्रक (एमएच १३ डीक्यू ९६४६) कोल्हापूरकडे निघाला होता. ट्रक मलकापूर (ता. कऱ्हाड) येथे झाडाखालचा वडापाव दुकानासमोर आला असता पंक्चर झाला. चालकाने पंक्चर काढण्यासाठी ट्रक महामार्गाकडेला उभा केला होता. पंक्चर काढत असताना पाठीमागून ट्रकला काहीतरी धडकल्याचा आवाज आला. चालकाने पाठीमागे जाऊन बघितले असता मोटार (जीए ०५ डी ८५७७) ट्रकखाली घुसली होती. अपघातात विष्णू सुतार यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने ते जागीच ठार झाले तर अभिजित मुळे गंभीर जखमी झाले आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

मुळे आणि त्यांचे कर्मचारी सुतार कामानिमित्त पेणला गेले होते. काम आटोपून परत गावी जात असताना मोटारीवरील ताबा सुटल्यामुळे अपघात झाला, अशी चर्चा अपघातस्थळी होती. परिसरातील नागरिकांनी अपघातस्थळी धाव घेतली. अपघातस्थळी बघ्यांची गर्दी झाल्यामुळे पुणे-कोल्हापूर मार्गिकेवरील वाहतूक काही काळ विस्कळित झाली होती.

कऱ्हाडचे पोलिस अपघातस्थळी दाखल झाले. जखमींना रुग्णालयात पाठवून पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वेणुताई उपजिल्हा रुग्णालयात पाठवून दिला. क्रेनच्या साह्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amruta Fadnavis Fugdi Video : 'पंढरपुरात विठूरायाची भक्ती अन्...'; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस-अमृता फडणवीसांनी घातली फुगडी, पाहा व्हायरल व्हिडिओ

Vidhansabha: संसदीय परंपरा आणि कायदा कसा बनतो? विद्यार्थ्यांनी समजून घेतली प्रक्रिया! मुख्यमंत्र्यांकडून भरभरून कौतुक!

Pandharpur Ashadhi Ekadashi Live Updates : पंढरपूर कॉरिडॉरचे काम कोणावरही अन्याय न करता योग्य पुनर्वसन करून पूर्ण करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Ashadhi Ekadashi 2026 Breakfast Recipe: आषाढी एकादशीच्या उपवासासाठी झटपट रेसिपी; १५ मिनिटांत बनवा मऊ, स्पंजी उपवासाची इडली

आजचे पंचांग आणि दिनविशेष - २५ जुलै २०२६

SCROLL FOR NEXT