Nashik Road Damage : खंबाळे-म्हसगण रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य; वाहनचालकांची कसरत

Nashik News : खंबाळे म्हसगण रस्त्याचे डांबरीकरण उखडले असून रस्त्यांवरील खड्डे टाळताना अनेक अपघात घडले तर अनेकांना पाठदुखीचा त्रास होत आहे.
Khambale Mhasgan bike riding through potholes and stagnant water on the road.
Khambale Mhasgan bike riding through potholes and stagnant water on the road.esakal

Nashik News : खंबाळे म्हसगण रस्त्याचे डांबरीकरण उखडले असून रस्त्यांवरील खड्डे टाळताना अनेक अपघात घडले तर अनेकांना पाठदुखीचा त्रास होत आहे. पेठ तालुक्यातील खंबाळे, हातरुंडी, दाभाडी, म्हसगण या गावांना जोडणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरण उखडल्यामुळे रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. (Many accidents happen while avoiding potholes on Khambale Mhasgan roads)

खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. खंबाळे- म्हसगण हा रस्ता आंबे, डिक्सळ, मोहदांड, शिवशेत, करंजखेड, उंबरपाडा, कापूर्णे आदी गावांतील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी व नागरिकांना तालुक्याच्या ठिकाणी सरकारी कामानिमित्ताने जाण्यासाठी पर्यायी आणि नजीकचा रस्ता असल्यामुळे रस्त्यावर रात्रंदिवस मोठी वर्दळ असते.

याच रस्त्यावरून पेठ आगाराची पेठ, दाभाडी, घुबडसाका बस रोज विद्यार्थी प्रवाशांची वाहतूक करते. खराब रस्त्यामुळे कधी-कधी बस रस्त्यातच बंद पडली तर विद्यार्थ्यांना आणि प्रवाशांना रस्त्यावरच तासन-तास ताटकळत उभे राहावे लागते. त्यामुळे खंबाळे म्हसगण रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांसह वाहनचालकांनी केली आहे. (latest marathi news)

Khambale Mhasgan bike riding through potholes and stagnant water on the road.
Nashik Water Shortage : 935 गावे-वाड्यांना 228 टॅंकरद्वारे पाणी; पावसाअभावी टॅंकरला 31 जुलैपर्यंत मुदतवाढ

"सरकारी किंवा शैक्षणिक कामानिमित्त तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी म्हसगण, हातरूंडी, खंबाळे हा रस्ता आम्हाला पर्यायी मार्ग जवळचा आहे." - विजय खंबाईत, (उपसरपंच म्हसगण )

"खंबाळे-म्हसगण पर्यायी रस्ता पेठ तालुक्याला जोडला असल्याने कामानिमित्त याच रस्त्यावरून रोज प्रवास करतो. या रस्त्यावर जास्त प्रमाणात खड्डे तयार झाल्याने वाहन आदळून सांधे, मणके, कंबरदुखीला सामोरे जावं लागत आहे." - गिरीधर खंबाईत (वाहनधारक)

Khambale Mhasgan bike riding through potholes and stagnant water on the road.
Nashik Dengue Update : जिल्ह्यात आतापर्यंत 79 रुग्णांना डेंगीची लागण! जूनमध्ये 28 डेंगींचे रुग्ण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com