corona  sakal
पश्चिम महाराष्ट्र

चहाची तलप महागात! विलगिकरणातील पॉझिटिव्ह चहासाठी एकाच्या घरी

वाढलेल्या रुग्ण संख्येमुळे गावात काही रुग्ण होम क्वारंटाईन केले

दिलीप क्षीरसागर

कामेरी : चहाची तलप..... भारी! विलगिकरणातील पॉझिटिव्ह (covid-19 positive) रुग्ण गेला चहा पिण्यासाठी एकाच्या घरी...असा पॉझिटिव्ह रुग्णांचा वावर कामेरी गावातील (kameri) रस्त्यावर होवू लागला आहे. त्यामुळे ग्रामस्थांत भीतीचे वातावरण आहे. कोरोनाची एवढी दशहत असताना या रुग्णांना (corona patients) त्यांचे काहीच गांभीर्य नाही. आत्तापर्यंत सहा जणांनी प्राण गमावले आहेत. दुसऱ्या लाटेतील जवळजवळ ९० च्यावर रुग्ण अॅक्टिव आहेत. या वाढलेल्या रुग्ण संख्येमुळे गावात काही रुग्ण होम क्वारंटाईन (home quarantine) केले आहेत.

काहींना येथील जिल्हा परिषद शाळेतील विलगिकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. या विलगीकरण कक्षातील एक रुग्ण आठ दिवसांपूर्वी चहाची तलप झाली म्हणून चक्क क्वारंटाईन कक्षातून ५०० मीटर असणाऱ्या एकाच्या घरी चहा पिण्यासाठी गेला होता. मात्र तो पॉझिटिव्ह असल्याने त्याला तेथे अटकाव करण्यात आला. तर एक रुग्ण चार दिवसांपूर्वी डोके दुखू लागल्याने मेडिकलमध्ये औषधी खरेदीसाठी गेला. होम क्वारटांईन असलेला एकजण आज किराणा माल खरेदीसाठी गेला होता. तर काही होम क्वारटांईन रुग्ण रस्त्यावर फिरत आहेत. यासांठी कोरोना समिती कार्यरत आहे, मात्र या सर्व सदस्यांना मोठी डोकेदुखी झाली आहे. वाढलेल्या रुग्ण संख्येमुळे ग्रामस्थांच्या भितीचे वातावरण पसरले आहे. तरी गावे पोलिस बंदोबस्त ठेवावा अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Auto Taxi Permit: फेक परमिट रिन्यूअलला लगाम लागणार! ऑटो-टॅक्सी चालकांची आता बायोमेट्रिक ओळख होणार, RTOचा कडक निर्णय

Education Recruitment Update: अशासकीय अनुदानित महाविद्यालयांत ५,०१२ सहाय्यक प्राध्यापक भरतीला मंजुरी; आरक्षण अंमलबजावणीसाठी विशेष प्रशिक्षण

Latest Marathi News Live Update : कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी

पालघरमध्ये मोठा राजकीय भूकंप! शिवसेना-भाजपला खिंडार; बड्या नेत्यांचा बविआमध्ये प्रवेश

11th Admission : अकरावी प्रवेशासाठी १२.४९ लाख विद्यार्थ्यांची नोंदणी; पहिल्या फेरीची निवड यादी शुक्रवारी जाहीर

SCROLL FOR NEXT