फिलिपाईन्स, इंडोनेशियातील 'काळे तांदूळ' आरोग्यासाठी ठरताहेत फायदेशीर

फिलिपाईन्स, इंडोनेशियातील 'काळे तांदूळ' आरोग्यासाठी ठरताहेत फायदेशीर

कोल्हापूर: भारतीय संस्कृती मध्ये अन्न (Food) हे पूर्णब्रह्म मानलं जातं. जेवणामध्ये पंचपक्वानाचा आस्वाद घेतला जातो. पश्चिम महाराष्ट्र मध्ये (Western Maharashtra)साधारणता ‌ जेवणामध्ये भाताचा (Rice) समावेश केलेला आहे. जेवताना थोडातरी भात असावा असा अनेकांचा आग्रह असतो. काही काहींना तरी भात खाल्ल्याशिवाय जेवण पूर्ण झाले नाही असे वाटते. यामध्ये आल्या मग वेगवेगळ्या निवडी. कोणाला बारीक तर कोणाला जाडाभरडा भात आवडत असतो. मात्र हा भात खात असताना आपण कधी विचार केला आहे का भात आरोग्यासाठीही किती फायदेशीर असतो. नाही ना चला तर जाणून घेऊया भाताचे आरोग्यदायी फायदे. आपण मार्केटमध्ये अनेक प्रकारचे तांदूळ पाहतो. इंद्रायणी, बासमती, कोलण, रत्नागिरी, घनसाळ, काळा जिरगा, आंबे मोहर, ब्राउन राईस आणि आता नव्याने समोर आला आहे तो ब्लॅक राईस. अशा विविध जाती आपण खरेदी करतो. आज याच जातींपैकी ब्लॅक राईस विषय आपण जाणून घेणार आहोत.(black-rice-benefits-in-health-immunity-power-information-kolhapur-news)

खरतर काळा तांदूळ हा भरपूर प्रथिनेयुक्त असा आहे. या तांदळात पिवळी रंगद्रव्ये असतात त्यांना अँथोसायनिन असे म्हणतात, तांदळाच्या कोंड्य़ात ती असतात. काळा तांदूळ हा सेंद्रीय तांदळापेक्षा वेगळा असून त्यात मोठय़ा प्रमाणावर लोह व जस्त असते. यात तंतुमय पदार्थ, लोह व तांबे हे घटक इतर तांदुळाच्या तुलनेत अधिक असतात. त्याचबरोबर यात ॲंटिऑक्सिडंट उच्च गुणवत्तेची वनस्पती प्रथिने असतात. हा भात शिजविल्यानंतर गडद जांभळ्या रंगाचा होतो.

अशी झाली या वाणाला सुरुवात

फार वर्षापूर्वी राजघराण्यातील लोकांसाठी चीनमध्ये Black Rice ची लागवड केली जात होती. त्यामुळे या तांदळाचे नाव Forbidden Rice असे ठेवण्यात आले. या तांदळातील वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्मामुळे युरोप व अमेरिकेपर्यंत याचा प्रसार झाला आणि त्यावर संशोधन होऊन औषधी गुणधर्म असल्याचे हे सिद्ध झाले. फिलिपाईन्समध्ये व इंडोनेशियात याची लागवड होते.

भारतात अशी झाली सुरूवात

या काळ्या तांदळाचे बियाणे मूळ मणिपूर व थायलंडचे आहे,.२००८ पासून आपण काळ्या तांदळाचे उत्पादन घेत आहोत. फोक राइस अँड फेस्टीव्हलमध्ये अलीकडेच तांदळाच्या १००० प्रजाती मांडण्यात आल्या होत्या.भारतात मणिपूर व पंजाबमधील शेतकरी मोठ्या प्रमाणात या तांदळाचे उत्पादन घेत आहेत. पोषणमूल्ये अधिक असलेल्या या तांदळाची भारत देशात उत्तरपूर्व राज्यात शेती केली जात आहे. आसाम व अन्य राज्यात तांदूळ पिकवला जातो. औषधी गुणधर्म असल्याचे स्पष्ट झाल्याने हा तांदूळ चीनमधून युरोपपूर्व देशापर्यंत पोहचला. टरफल न काढलेली सत्त्वयुक्त ब्राऊन राईसला सध्या बाजारात मागणी वाढत आहे; पण यापेक्षा अधिक सत्त्वयुक्त व औैषधी मूल्य असलेल्या काळ्या तांदळाची मागणी देश-विदेशातून होत असून याला चांगला दरही मिळत आहे. राज्यात नागपूर विभागात कृषी विभागाने या तांदळाच्या लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रेरित केले आहे.

काळ्या तांदळाची वैशिष्टय़े

अँथोसायनिन हे पिवळे रासायनिक द्रव्य.

अँटीऑक्सिडंटचे प्रमाण जास्त.

मधुमेहावरही गुणकारी.

मूळ प्रजात मणिपूर व थायलंडची.

काळ्या तांदळाचे फायदे

काळ्या तांदळाचे अनेक फायदे आहेत. हे फायटोकेमिकल कोलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रित ठेवते ,हृदयामधील धमन्यांमध्ये अर्थोस्क्‍लेरोसिस प्लेक फर्मेशनची शक्‍यता कमी करते, लठ्ठपणा कमी करते ,या तांदळामध्ये असलेल्या फायबरमुळे अन्नपचन व्यवस्थित होते, तांदळामधील एंटीऑक्‍सीडेंट तत्त्वामुळे त्वचा व डोळ्यांना फायदा होतो.

हृदय : हृदयाच्या आरोग्यासाठी काळे तांदूळ फायदेशीर आहे. यामधले फायटोकेमिकल कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण ठेवतात. हे कोलेस्ट्रॉल कमी करण्यात मदत करतात. याव्यतिरिक्त हे हृदय रक्तवाहिन्यांमध्ये अर्थ्रोस्क्लेरोसिस प्लेक निर्मितीची शक्यता कमी करतात ज्याने हार्ट अटॅक आणि स्ट्रोकची शक्यता कमी होते.

लठ्ठपणा : अनेक लोकं लठ्ठपणा वाढू नये म्हणून भात खाणे टाळतात. अशा लोकांसाठी काळे तांदूळ फायदेशीर आहेत. कारण यामुळे लठ्ठपणा कमी होतो.

पचन: यात मोठ्या प्रमाणात फायबर आढळतात. जे बद्धकोष्ठता दूर करतात. पचनसंबंधित तक्रारही यामुळे दूर होतात.

रोगप्रतिकार शक्ती : एंथोसायनिन नामक अँटीऑक्सीडेंट भरपूर प्रमाणात आढळतात. जे कार्डियोवेस्कुलर आणि कर्करोग सारखे रोगांपासून बचाव करतात. यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढते.

अँटीऑक्सीडेंट : हे तांदुळ गडद रंगाचे आहेत. अँटीऑक्सीडेंट तत्त्वांमुळे यांचा रंग गडत असतो जो आपल्या त्वचा, मेंदु आणि डोळ्यांसाठी खूपच फायदेशीर आहे.

या तांदळाचे फायदे लक्षात घेऊन अनेक शेतकरी हे वाण लावण्यासाठी प्रयोग करत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यात वीस एकर परीसरात आता हा प्रयोग होणार आहे. यासाठी आजरा तालुका शेतकरी खरेदी विक्री संघात शेतकऱ्यांसाठी 100 किलो या दरात हे वाण उपलब्ध झाले आहे. 90 ते 110 दिवसांमध्ये हा तांदूळ पिकून पिकून तयार होतो.

कृषी विभाग कोल्हापूर, आणि शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांनी या जुना वाण संवर्धनातून काळा तांदूळ शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिला आहे. राधानगरी, शाहूवाडी, चंदगड.पन्हाळा या तालुक्यातील बऱ्याच शेतकऱ्यांना हे वाण मिळाले आहे.

संभाजी सावंत (आजरा तालुका शेतकरी मंडळाचे अध्यक्ष )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com