Pooja Jadhav esakal
पश्चिम महाराष्ट्र

Sangli : अंधश्रद्धांना छेद देण्यासाठी पूजाचं धाडस; सूर्यग्रहण पाहिलं अन् दिला गोंडस बाळाला जन्म

ग्रहणकाळात पूजा जाधव यांनी सौर चष्म्यातून थेट ग्रहणात काळवंडलेल्या सूर्याशी डोळे भिडवले होते.

सकाळ डिजिटल टीम

हा उपक्रम राबवण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व शंभूराजे प्रतिष्ठान यांनी पुढाकार घेतला.

नवेखेड : अंधश्रद्धेला छेद देऊन ग्रहणाशी डोळे भिडवणाऱ्या ‘सावित्रीच्या लेकी’ने गोंडस अशा सदृढ कन्यारत्नाला जन्म दिला. मुलीचे नुकतेच राजनंदिनी असे नामकरण करण्यात आले आहे.

अंधश्रद्धेत अडकलेल्या समाजाला बाहेर काढण्यासाठी नवेखेड येथील ‘सावित्रीच्या लेकी’ने परंपरेशी विद्रोह करून सूर्यग्रहणाशी डोळे भिडवून अंधश्रद्धेला छेद दिला होता. याबाबत सविस्तर वृत्त असे की, नवेखेड येथील पूजा ऋषिराज जाधव, ऋषिराज मोहन जाधव या उच्चशिक्षित दाम्पत्याने पुढाकार घेऊन समाजातील ग्रहण न पाहण्याच्या अनिष्ट प्रथेला मूठमाती दिली होती आणि समाजासमोर नवा आदर्श निर्माण केला.

ग्रहणकाळात पूजा जाधव यांनी सौर चष्म्यातून थेट ग्रहणात काळवंडलेल्या सूर्याशी डोळे भिडवले होते. विशेष म्हणजे त्यांनी सर्व कुटुंबीयांचे सहकार्य मिळाले. पूजा जाधव यांच्या आजीसासू शांताबाई जाधव, सासू माजी सरपंच छाया जाधव, सासरे मोहन जाधव, दीर पंकज जाधव, जाऊ प्रियांका जाधव यांची साथ मिळाली. ग्रहणकाळात जे करायचे नाही ते करून दाखवत, पूजा यांनी आदर्श निर्माण केला.

हा उपक्रम राबवण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व शंभूराजे प्रतिष्ठान यांनी पुढाकार घेतला. पूजा-ऋषिराजसह कुटुंबीयांनी नातलगांच्या उपस्थितीत नुकत्याच जन्मलेल्या कन्यारत्नाचे राजनंदिनी असे दिमाखदार सोहळ्यात नामकरण केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Koyna Dam Water Level : कोयना धरण 100 टक्के भरले! धरणातून 1,050 क्युसेक विसर्ग सुरू; कृष्णा-कोयना नदीकाठच्या नागरिकांना खबरदारीचं आवाहन

Sangamner Ganeshotsav: गणेशोत्सवात लेझर, प्लाझ्माला ‘नो एंट्री’! जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांचे आदेश; धनिप्रदूषणमुक्त उत्सव होणार

Supreme Court: सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय! निवृत्तीचे वय ६० की ६२? सात राज्यांसाठी नियम बदलणार, नेमका काय आहे आदेश?

Marathi News Live Updates: टीव्ही सेंटरमधील प्यासा वाईन शॉपखालील अवैध दारू अड्डा उद्ध्वस्त; मद्यपींसह मालक ताब्यात

Gold Rate Today: सोन्याच्या भावात मोठी घसरण! 10 दिवसांपासून सोनं स्वस्त; आज मुंबई-पुण्यात किती आहे भाव?

SCROLL FOR NEXT