Russia Ukraine War sakal
पश्चिम महाराष्ट्र

Russia Ukirane War : युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या माहीतीसाठी 24/ 7 नियंत्रण कक्ष,

बेळगाव जिल्ह्यातील एकूण आठ विद्यार्थी सध्या युक्रेनमध्ये अडकले

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव: युक्रेनमध्ये बेळगाव जिल्ह्यातील 8 विद्यार्थी अडकले आहेत. या विद्यार्थ्यांची माहिती घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाने 24/7 नियंत्रण कक्ष सुरू केला आहे. तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन तज्ञ निंगनगौडा चन्नबसनगौडर यांची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यामुळे शिक्षणासाठी गेलेले हजारो विद्यार्थी त्या ठिकाणी अडकून पडले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या कुटुंबाची काळजी वाढली असून अनेक जण युक्रेन मध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना कधी माघारी आणणार असा प्रश्न विचारीत आहेत. बेळगाव जिल्ह्यातील एकूण आठ विद्यार्थी सध्या युक्रेनमध्ये अडकले असून सरकारच्या माहितीनुसार युक्रेन येथील खारकिव्ह नॅशनल मेडिकल विद्यापीठात 7 शिक्षण घेत आहेत. मात्र या ठिकाणीही हल्ला झाल्यामुळे सध्या या विद्यापिठातील विद्यार्थी निर्वासित झाले आहेत तसेच त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.

बेळगाव जिल्ह्यातील प्रिया छब्बी, प्रीती छब्बी, श्रेया हरकल, अमोघ चौगुला, प्रिया निडगुंडी, रक्षित गणी, अफरिन मदारसाब हे एकाच विद्यापिठात तर निपाणी तालुक्यातील कारदगा गावातील सुरज भाकोजी हा विद्यार्थी आयव्हानो शहरात अडकला आहे. मात्र सध्या हे विद्यार्थी आपल्या पालकांच्या संपर्कात आहेत. मात्र युक्रेनमधील परिस्थिती दिवसेंदिवस धोकादायक बनत असून आपली मुले सुखरूप पणे भारतात परत यावीत यासाठी पालकांचा धावा सुरू झाला आहे.

पालक मंत्री गोविंद कारजोळ यांनी कर्नाटकातील 120 विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत. तसेच केंद्र सरकार या विद्यार्थ्यांना सुखरूप पणे भारतात आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती दिली आहे.

जिल्हा प्रशासनाने 24 / 7 नियंत्रण कक्षाची सुरवात करून सातत्याने युक्रेनमधील परिस्थितीची माहिती आणि तिकडे अडकलेल्या विद्यार्थ्यांची माहिती उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे पालकांना दिलासा मिळाला असून 0831 - 2407290 किंवा 9449363356 या क्रमांकावर नोडल अधिकारी उपलब्ध आहेत.

मिलिंद देसाई

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT