पश्चिम महाराष्ट्र

सांगली महापालिकेवर कमळ फुलले

सकाळवृत्तसेवा

सांगली - सांगली मिरज कुपवाड शहर महापालिकेच्या पाचव्या पंचवार्षिक निवडणुकीच्या मतमोजणीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात भाजपने जोरदार मुसंडी मारत सत्तेच्या दिशेने कूच केले आहे. जाहीर जागांमधील भाजपने 41 जागांवर तर कॉंग्रेस 20, राष्ट्रवादी 15 जागांवर विजय मिळवला आहे. अन्यमध्ये स्वाभीमानी आघाडी एक व अपक्ष एक असे बलाबल आहे. 

सांगलीवाडी, गावभाग, कर्नाळ रस्ता परिसर, पुर्ण विश्रामबाग असे चार प्रभागात शंभर टक्के यश मिळवताना ही मुसंडी मारली. चुरशीच्या खणभागात भाजपच्या स्वाती शिंदे यांनी निर्णायक आघाडी घेतली आहे. उर्वरित तीन जागांपैकी एका जागेवर महापौर हारुण शिकलगार यांच्यासह उत्तम साखळकर, रुपाली चव्हाण या कॉंग्रेस उमेदवारांनी आघाडी घेतली आहे. 

अंतिम निकाल - 

भाजप 41, कॉंग्रेस 20, राष्ट्रवादी 15 जागांवर विजयी, स्वाभीमानी आघाडी 1, अपक्ष 1 

सकाळच्या टप्प्यात कॉंग्रेस-राष्ट्रवादीने आघाडी घेतली. मात्र दुसऱ्या टप्प्यानंतर भाजपने जोरदार मुसंडी मारत आघाडी घेतली. सांगली आणि मिरज या दोन्ही ठिकाणी हक्काचे प्रभाग जिंकताना भाजपने कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या प्रभागातही घुसखोरी करीत बहुतमाच्या दिशेने कूच केले.

मात्तबर पराभूत

मात्तबर पराभूतांमध्ये माजी महापौर किशोर जामदार, माजी महापौर विवेक कांबळे कुपवाडचे राष्ट्रवादीचे नेते धनपाल खोत यांचा समावेश आहे. खोत यांना कुपवाडमध्ये प्रभाग एक मध्ये स्वाभीमानी आघाडीचे विजय घाडगे यांनी तर प्रभाग 7 मध्ये जामदार यांना त्यांचे चेले गणेश माळी यांनी भाजपमध्ये जाऊन धक्का दिला. 

सर्वात धक्कादायक निकाल

सर्वात धक्कादायक निकाल प्रभाग पंधराचा लागला. खासदार संजय पाटील यांचे मामेभाऊ रणजीत सावर्डेकर पराभूत झाले. हे घराणे सांगलीतील प्रतिष्ठित असून भारतभीम जोतीरामदादा पाटील यांच्या नातसून सोनल पराभूत झाल्या. सांगलीतील प्रभाग 15 मध्ये धक्कादायक निकाल लागले. खासदार संजय पाटील यांच्यासाठी प्रतिष्ठेचा हा प्रभाग होता. नातलग कुटुंबिय सावर्डेकरांच्या कुटुंबातील सोनल, रणजीत पराभवाचा धक्का बसला. इथे युवक कॉंग्रेसचे शहराध्यक्ष मंगेश चव्हाण, फारुक पठाण यांनी खासदारांना धक्का देत कॉंग्रेसला इथे एकहाती यश मिळवून दिले. खासदारांनी या प्रभागात पंधरा दिवस तळ ठोकला होता. 

ऐनवेळी भाजपमध्ये दाखल झालेले मिरजेतील नगरसेवक सुरेश आवटी यांनी प्रभाग 3 मधील सर्व उमेदवार विजयी करीत आपण अजिंक्‍य असल्याचे सिध्द केले. त्यांची दोन्ही मुले संदीप व निरंजन विजयी झाले आहेत.

प्रभाग 6 माजी महापौर मैन्नुदीन बागवान, माजी महापौर इद्रीस नायकवडी यांचे चिरंजीव अतहर नायकवडी, रजीया काझी, नर्गीस सय्यद यांनी विजय मिळवला. प्रभाग 7 मध्ये जामदार फक्त 152 मतांनी पराभूत झाले. त्या प्रभागातील अन्य तीन जागाही जिंकल्या. स्थायी समितीचे विद्यमान सभापती बसवेश्‍वर सातपुते यांना आनंदा देवमाने, गायत्री कुल्लोळी, संगीता खोत असे तीन भाजपचे उमेदवार विजयी झाले. 

जाहीर निकाल विजयी उमेदवार -
प्रभाग 1 - शेडजी मोहिते ( राष्ट्रवादी), राईसा रंगरेज ( कॉंग्रेस), पद्मश्री पाटील ( कॉंग्रेस),विजय घाडगे ( स्वाभिमानी) 
प्रभाग 2 - सविता मोहिते (राष्ट्रवादी), वहिदा नायकवडी (कॉंग्रेस), प्रकाश ढंग (भाजप), गजानन मगदूम (अपक्ष), 
प्रभाग 3 - अनिता व्हनखंडे, शिवाजी दुर्वे, शांता जाधव, संदीप आवटी (सर्व भाजप) 
प्रभाग 4 - पांडुरंग कोरे, अस्मिता सरगर, मोहना ठाणेदार, निरंजन आवटी (सर्व भाजप) 

प्रभाग 5 -  संजय मेंढे, बबीता मेंढे, करण जामदार (काँग्रेस), मालन हुलवान (राष्ट्रवादी) 

प्रभाग 6 - मैनुद्दीन बागवान, नर्गिस सय्यद, रजिया काझी, अतहर नायकवडी (सर्व राष्ट्रवादी) 
प्रभाग 7 - आनंदा देवमाने, संगीता खोत, गायत्री कल्लोळी, गणेश माळी (सर्व भाजप) 
प्रभाग 8 - सोनाली सागरे, कल्पना कोळेकर, राजेंद्र कुंभार (भाजप), विष्णू माने (राष्ट्रवादी) 
प्रभाग 9 - मनगु सरगर (राष्ट्रवादी), रोहिणी पाटील, मदीना बारूदवाले, संतोष पाटील (कॉंग्रेस) 
प्रभाग 10 - जगन्नाथ ठोकळे, अनारकली कुरणे (भाजप), प्रकाश मुळके,वर्षा निंबाळकर (कॉंग्रेस) 
प्रभाग 11 - कांचन कांबळे, मनोज सरगर, शुभांगी साळुंखे, उमेश पाटील (सर्व कॉंग्रेस) 
प्रभाग 12 - संजय सरगर, नसीम शेख, लक्ष्मी सरगर, धीरज सूर्यवंशी (सर्व भाजप) 
प्रभाग 13 - गजानन आलदर, अपर्णा कदम, अजिंक्‍य पाटील (सर्व भाजप) 
प्रभाग 14 - सुब्राव मद्रासी, उर्मिला बेलवलकर, भारती दिगडे, युवराज बावडेकर (भाजप) 
प्रभाग 15 - फिरोज पठाण, आरती वळवडे, पवित्र केरीपाळे, मंगेश चव्हाण (सर्व कॉंग्रेस) 
प्रभाग 16 - हारुण शिकलगार, उत्तम साखळकर (कॉंग्रेस), स्वाती शिंदे, सुनंदा राऊत (भाजप) 
प्रभाग 17 - गीता सुतार, गीता सूर्यवंशी, लक्ष्मण नवलाई (सर्व भाजप) दिग्विजय सूर्यवंशी (राष्ट्रवादी) 
प्रभाग 18 - अभिजीत भोसले (कॉंग्रेस), महेंद्र सावंत, स्नेहल सावंत, नसीम नाईक (भाजप) 
प्रभाग 19 - अप्सरा वायदंडे, सविता मदने, संजय कुलकर्णी, विनायक सिंहासने (भाजप) 
प्रभाग 20 - योगेंद्र थोरात, संगीता थोरात, प्रियांका पारधी (सर्व राष्ट्रवादी) 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

J&K Bus Accident : जम्मू-काश्मीरमध्ये खोल दरीत बस कोसळली; 4 जवान ठार, ३१ जखमी

Mukesh Ambani यांनी खरेदी केलं १००० हून अधिक कोटीचं विमान; देशात असं Jet कोणाकडेच नाही; काय आहे खास?

Mumbai News: भर रस्त्यात महिलेला प्रसूतीकळा; ताडपत्री अन् बॅनरच्या मदतीने पोलिसांनी साधलं प्रसंगावधान

Yashasvi Jaiswal ने सुनील गावसकरांचा विक्रम मोडला, सर डॉन ब्रॅडमन यांच्या पंगतीत जाऊन बसला

Mumbai Senate Election: मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थागित; सुप्रिया सुळेंची सडकून टीका

SCROLL FOR NEXT